शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

परभणी : रोहित्रासाठी शिवसेनेचा महावितरणला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 12:17 AM

जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेले २०० विद्युत रोहित्र नांदेडला पाठविल्याच्या प्रकरणाचा जाब विचारत आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शिवसैनिकांनी ५ नोव्हेंबर रोजी कार्यकारी अभियंता राजेश लोंढे यांना घेराव घातला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेले २०० विद्युत रोहित्र नांदेडला पाठविल्याच्या प्रकरणाचा जाब विचारत आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शिवसैनिकांनी ५ नोव्हेंबर रोजी कार्यकारी अभियंता राजेश लोंढे यांना घेराव घातला़जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेल्या निधीतील २०० विद्युत रोहित्र नांदेडला वळविल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे़ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र मिळत नसताना हे विद्युत रोहित्र परस्पर पाठविल्याने सोमवारी आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी महावितरण कार्यालय गाठून घेराव आंदोलन केले़ या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आ़ पाटील यांनी केली़ भ्रमणध्वनीवरून नांदेड येथील मख्य अभियंत्यांशी संपर्क साधून त्यांनी झालेल्या प्रकाराची माहिती दिली़ त्यावर मुख्य अभियंत्यांनी चौकशीचे आश्वासन दिले़ दरम्यान, या प्रश्नी विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे आ़ पाटील यांनी सांगितले़ जिल्हा नियोजन समितीतून अनेक गावांसाठी रोहित्र मंजूर झाले होते़ मात्र सध्या रोहित्र मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून येत आहेत़ रबी हंगामासाठी कालव्यातून पाणी सोडले असताना केवळ विजेअभावी पाणी देता येत नाही़ दुष्काळी परिस्थितीतही महावितरणचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत़ याबद्दल संताप व्यक्त करीत आ़ पाटील यांनी कार्यकारी अभियंता लोंढे यांना जाब विचारला़ यावेळी माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, तालुकाप्रमुख नंदकुमार आवचार, अनिल डहाळे, रवि पतंगे, नवनीत पाचपोर, शिवाजी चोपडे, दामोधर सानप, उत्तम मुळे, रमेश चोपडे, संजय गरुड, सुभाष बागल, कैलास भेंडे, लक्ष्मण भालेराव, कदम, विजू काळे, गोविंद काळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारीWaterपाणी