लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी) : बारा दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून पूर्णा कोल्हापुरी बंधाऱ्यात २७ डिसेंबर रोजी पाणी धडकणार असल्याची माहिती नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांनी दिली.पूर्णा नदीपात्रात कोल्हापुरी बंधाºयात अडविलेले पाणी शहरासाठी वापरले जाते. एकदा बंधारा पूर्ण भरल्यानंतर चार महिने शहराला पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे; परंतु, नादुरुस्त दरवाजे व बंधाºयाच्या तळभागातून होणाºया पाणी गळतीमुळे पाण्याचा मोठा अपव्यय होतो. यामुळे चार महिने पुरणारे पाणी हे दोन ते अडीच महिन्यातच संपते. बंधाºयात पाणीसाठा शिल्लक नसल्याने ऐन हिवाळ्यात शहरात बारा दिवसांपासून नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा खंडित झाला होता. बंधाºयात पाणी नसल्याने शहरातील खाजगी व सार्वजनिक हातपंपांनी तळ गाठला आहे. पाणीपातळी खोलवर गेल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे पाणी रोटेशन तसेच नादुरुस्त बंधाºयाचे दरवाजे बदलून नवीन दरवाजे टाकण्याबाबत मागणी केल्यानंतर २३ डिसेंबर रोजी सिद्धेश्वर धरणातून परभणी व पूर्णा शहरासाठी पाणी सोडण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळपर्यत पूर्णा कोल्हापुरी बंधाºयात ०.५ दलघमी पाणी सोडण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बारा दिवसांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरवासियांना पाणी मिळणार आहे.बहुतांश हातपंप पडले बंद४पाणीटंचाईच्या काळात पर्याय म्हणून पालिकेद्वारे प्रत्येक प्रभागात हातपंपांची व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु, अनेक हातपंप पाणी नसल्याने कोरडे पडले आहेत. तर बहुतांश हातपंप दुरुस्तीअभावी बंद आहेत. बंद पडलेले हातपंप दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.बंधारा दुरुस्त करण्याची मागणी४पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधारा हा पूर्णपणे नादुरुस्त आहे. या बंधाºयाच्या तळ भागातून व दरवाजातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते.४याबाबत पालिका प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा केला जातो; परंतु, संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ऐन दुष्काळात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे.४पूर्णा येथील बंधाºयाची दुरुस्ती केली तर दुष्काळात पाण्याचा अपव्यय थांबविणे शक्य होणार आहे.
परभणी : पूर्णेवरील पाणीटंचाईचे संकट अखेर टळले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:46 PM