शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

परभणी : १५ गावांमध्ये वॉटर कप स्पर्धेंतर्गत श्रमदान सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 11:41 PM

पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेेत तालुक्यातील ५० गावांनी सहभाग घेतला आहे. यातील १५ गावांतील ग्रामस्थांनी ७ एप्रिल रोजीच्या मध्यरात्रीपासून श्रमदानाला सुरुवात केली.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेेत तालुक्यातील ५० गावांनी सहभाग घेतला आहे. यातील १५ गावांतील ग्रामस्थांनी ७ एप्रिल रोजीच्या मध्यरात्रीपासून श्रमदानाला सुरुवात केली.दरवर्षी पर्जन्यमानात होत असलेली घट पाहता तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी ५० गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. याअंतर्गत प्रशिक्षणातून परतलेल्या अरबूजवाडी, येळेगाव, सिरसम, मरडसगाव, मालेवाडी, सुप्पा खालसा, सुप्पा जहागीर, हरंगुळ, डोंगरजवळा, गुंजेगाव, बडवणी, घटांग्रा आदी गावातील ग्रामस्थांनी हालगी, सनई, टाळ, मृदंग वाजवून गावात दवंडी देत पाणी फाऊंडेशनमार्फत घेण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविला. पडणाºया पावसाचा प्रत्येक थेंब गाव शिवारात अडविण्यासाठी श्रमदानाची मशाल पेटवित ७ एप्रिल रोजीच्या मध्यरात्रीपासून गाव शिवारात परिसरात श्रमदान करण्यास सुरुवात केली. अरबूजवाडी येथे गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी मध्यरात्री १२ वाजेपासून सुरू झालेल्या या श्रमदानाच्या कामात गोदावरी तांडा, अरबूजवाडी, वागदरा, डोंगरजवळा, इळेगाव, सिरसम, मालेवाडी सुप्पा खालसा आदी गावात रात्री १२ वाजता ८१७ ग्रामस्थांनी श्रमदानाला सुरुवात केली. यशस्वीतेसाठी पाणी फाऊंडेशनचे समन्वयक रवीकर्ण इंगोले, राजेभाऊ कदम, बाळासाहेब गुळभिले आदी प्रयत्न करीत आहेत.सिंचनास होणार मदतपाणी फाऊंडेशनच्या वतीने गंगाखेड तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत यावर्षी ५० गावांनी सहभाग घेतला आहे. त्यातील बारा गावातील ग्रामस्थांनी पाणी फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर या गावातील ग्रामस्थांनी प्र्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. उर्वरित ३८ गावातील ग्रामस्थ येत्या काळात काम सुरू करणार आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यामध्ये तालुक्यातील ५० गावांमध्ये पाणी अडविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दुष्काळात या गावांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा