परभणी : परिस्थिती दुष्काळ सदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:11 AM2018-10-30T00:11:40+5:302018-10-30T00:13:22+5:30

परभणी जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळाच्या यादीतून वगळून अगोदरच जिल्ह्यावर अन्याय करण्यात आला आहे़ अशात मुख्यमंत्रीही दुष्काळ सदृश्य परिस्थिती संबोधत आहेत़ त्यांच्याच भाषेनुसार जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना पालकमंत्री मात्र जिल्ह्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून अदृश्य झाले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी येथे बोलताना केली़

Parbhani situation is similar to drought and Guardian Minister disappears: Ashok Chavan criticizes | परभणी : परिस्थिती दुष्काळ सदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य - अशोक चव्हाण

परभणी : परिस्थिती दुष्काळ सदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य - अशोक चव्हाण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : परभणी जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळाच्या यादीतून वगळून अगोदरच जिल्ह्यावर अन्याय करण्यात आला आहे़ अशात मुख्यमंत्रीही दुष्काळ सदृश्य परिस्थिती संबोधत आहेत़ त्यांच्याच भाषेनुसार जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना पालकमंत्री मात्र जिल्ह्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून अदृश्य झाले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी येथे बोलताना केली़
काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेंतर्गत पाथरी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी व्यासपीठावर खा़ राजीव सातव, विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी खा़ तुकाराम रेंगे, माजी आ़ सुरेश देशमुख, पंडितराव चोखट, बालकिशन चांडक, रामभाऊ घाडगे, समशेर वरपूडकर, प्रभाकर शिंदे, हरिभाऊ शेळके, जयश्री खोबे, प्रेरणा वरपूडकर, द्वारकाबाई कांबळे, बाळासाहेब रसाळ, धोंडीराम चव्हाण आदी उपस्थित होते़ यावेळी बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले की, परभणी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे़ तरीही जिंतूर, गंगाखेड व पूर्णा ही तीन तालुके वगळून जिल्ह्यावर अन्याय करण्यात आला आहे़ त्यामुळे या सरकारला आता तुम्हीच धडा शिकवा़ लोकसभा निवडणुकीनंतर परभणी महापालिकेत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवून विजयाची सुरुवात केली आहे़ त्यामुळे आता जिल्हा काँगे्रसमय करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले़ शिवसेना सत्तेत राहून मलिदा लाटत आहे आणि रस्त्यावर येऊन विरोधाचे नाटक करीत आहे़ यांचे ढोंग जनतेला कळून चुकले आहे़ ‘आतून कीर्तन बाहेरून तमाशा’ अशी या दोन्ही पक्षांची स्थिती आहे़ आम्ही ‘दोघे भाऊ मिळून सर्व खाऊ’ असेच राज्यात सुरू आहे, असेही ते म्हणाले़ २०१४ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला फक्त ३० टक्के मते मिळाली होती़ परंतु, ७० टक्के मतांचे विभाजन झाले़ त्यामुळे ते सत्तेत आले़ आता तशी चूक होऊ देऊ नका़ एमआयएम, मनसेला सोडून बाकी ७० टक्क्यांना एकत्र करून त्यांच्या पाठीशी उभे राहा़ महानगरपालिकेप्रमाणे काँग्रेसला साथ द्या, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले़ भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले देशाचे संविधान बदलण्याचा भाजपाकडून प्रयत्न सुरू आहे़ हा प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन चव्हाण यांनी केले़ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घराघरामध्ये पोहचून जनसंपर्क वाढवावा, भाजपाची खोटी आश्वासने जनतेसमोर मांडून काँग्रेस-आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या जनहिताच्या निर्णयाची माहिती जनतेला द्यावी, असेही यावेळी ते म्हणाले़ यावेळी खा. सातव यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष वरपूडकर यांनी केले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबा ढगे, विजय घुंबरे, मुखीद जहागीरदार, अली अफसर अन्सारी आदींनी परिश्रम घेतले़
जायकवाडीचे हक्काचे : पाणी मिळायला हवे
४यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, जायकवाडी धरणाची निर्मिती करतेवेळी कोणत्या भागाला किती पाणी मिळाले पाहिजे, हे निश्चित केलेले असल्याने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळायला पाहिजे़ राज्य सरकार मराठवाड्यातील धरणांना निकामी करण्याचे काम करीत आहे़ निर्णय होऊनही पाणी सोडले जात नाही, हा सरकारचा नाकर्तेपणा आहे, असे ते म्हणाले़ जलयुक्तची कामे ज्या ठिकाणी झाली, त्याच ठिकाणी पाणी पातळी खोलवर गेल्याचे सांगून ही कामे जलयुक्त नव्हे तर ‘झोलयुक्त’ झाली आहेत, असेही यावेळी ते म्हणाले़

Web Title: Parbhani situation is similar to drought and Guardian Minister disappears: Ashok Chavan criticizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.