लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील एम.आय.डी.सी. परिसरातील एका शेतात शेतमजुरांना आढळलेला सहा फूट लांबीचा अजगर पकडून येथील सर्पमित्रांनी शेतकऱ्यांना भयमुक्त केले आहे.येथील साहेबराव जाधव यांच्या शेतात २० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास धुºयावरील गवत काढण्याचे काम काही मजूर करीत होते. यावेळी शेतमजूर सोमनाथ राऊत यांना साप दिसला. परड या जातीचा हा साप असावा, अशी शंका त्यांना आली. ही माहिती त्यांनी साहेबराव जाधव यांना दिली. जाधव यांनी तत्काळ सर्पमित्र रणजीत कारेगावकर यांना फोनवरुन माहिती दिली. तेव्हा रणजीत कारेगावकर यांच्यासह ज्ञानेश डाके, वैभव सरोदे त्या ठिकाणी पोहोचले. या सर्पमित्रांनी तत्काळ सापाला पकडले. हा साप अजगर या जातीचा असून, तो बिनविषारी असल्याचे कारेगावकर यांनी सांगितले. यावेळी शंकर शिंदे, अर्जून पातळे, सुनील गवळी, चांदोजी राऊत, वेदांत माळवतकर, अंकूश पातळे आदींनी या सापाचे प्राण वाचविण्यासाठी सहकार्य केले.
परभणी : सर्पमित्रांनी पकडला सहा फुटाचा अजगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:45 AM