लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील पाथरी, सोनपेठ, मानवत, पालम, सेलू आणि गंगाखेड या सहा तालुक्यांमध्ये रविवारी रात्री जोरदार पाऊस झाला़ या पावसाने ओढ्या-नाल्यांना पूर आला असून, अनेक भागांत पाणी साचले आहे़ पाथरी तालुक्यात हादगाव बु़ येथे ओढ्याच्या पुरात वाहून जाणाऱ्या शेतकºयाने आपला जीव वाचविल्याची घटना सोमवारी सकाळी घडली़जिल्ह्यात मागील आठवड्यात दमदार पाऊस झाला होता़ रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होते़ मात्र काही तालुक्यांमध्येच पावसाने हजेरी लावली आहे़ त्यात पाथरी तालुक्यात रविवारी पहाटे विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला़ त्याच प्रमाणे सोनपेठ तालुक्यात रात्री ११ वाजेच्या सुमारास तर मानवत तालुक्यात सोमवारी पहाटे आणि गंगाखेड तालुक्यात रविवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली़ सेलू परिसरातही रात्रीच्या सुमारास पाऊस झाला आहे़ गंगाखेड शहर परिसरात रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने शहरातील रझा कॉलनीतील अनेक घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले़स्वयंपाक घर, बेडरुममध्येही पाणीच पाणी झाल्याने येथील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली़ अंदाजे २ तास हा पाऊस झाला़ त्यात गंगाखेड मंडळामध्ये २९ मिमी, माखणी ६ मिमी तर महातपुरी मंडळा ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ सोनपेठ शहर परिसरात रात्री १० ते ११ या एक तासात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला़ या पावसामुळे शेळगाव येथील फाल्गुनी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे़ दरम्यान, सोमवारी सायंकाळी देखील गंगाखेड शहरामध्ये अर्धा तास जोरदार वृष्टी झाली़ परभणी, पालम तालुक्यात केवळ रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे़ दिवसभर ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली होती़झाडावर कोसळली वीज४पाथरी तालुक्यात सोमवारी पहाटे जोरदार पाऊस झाला़ या पावसा दरम्यान, खेर्डा येथील अविनाश आम्ले यांच्या गट नंबर ११७ मधील शेतातील झाडावर एक वीज कोसळली़ त्यामुळे या झाडाचे मुख्य खोड मधोमध कापले गेले आहे़४सोमवारी खेर्डा आणि परिसरात पावसामुळे ग्रामस्थांची मोठी धावपळ उडाली़ ओढ्याला पूर आल्याने हा मार्ग ठप्प पडला होता़ सायंकाळच्या सुमारास पुराच्या पाण्यामुळे खेर्डा रस्ता पूर्णत: वाहून गेला आहे़पावसाने हादगाव येथील शाळा, घरे पाण्याखाली४पाथरी तालुक्यात २३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री पावसाला सुरुवात झाली़ पहाटेपर्यंत या पावसाचा जोर कायम होता़ त्यामुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील हादगाव बु़ येथील शाळा आणि गावातील काही घरे पाण्याखाली गेली होती.४पाथरी-आष्टी रस्त्यावर हादगाव जवळ पुराचे पाणी रस्त्यावर आले होते़ तसेच पाथरी-सेलू रस्त्यावर बोरगव्हाण या गावाजवळही पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद पडली होती़ जायकवाडी धरणाच्या पाण्याने गोदावरी नदीचे पात्र तुडूंब भरून वाहत आहे़ त्यातच जोरदार पाऊस झाल्याने आता या भागातील ओढ्या-नाल्यांनाही पूर आले आहे.४२३ सप्टेंबर रोजी पहाटे ४ ते ६ या दोन तासांत हादगाव आणि कासापुरी भागात मुसळधार पाऊस झाला़ वरखेड, रेणाखाळी भागात झालेल्या पावसाने हादगाव जवळील पुलाला पूर आला होता़४त्यातच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तसेच आंबेडकर नगर, आझाद वस्ती भागातील काही घरात पाणी शिरले़ मानवत भागात झालेल्या पावसाने पाथरी- सेलू रस्त्यावर बोरगव्हाण नाल्यालाही पूर आला होता़ तालुक्यातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला असला तरी बाभळगाव आणि लिंबा या दोन मंडळांतर्गत मात्र रिमझिम पाऊसच झाला आहे़बोरवंड परिसरात जोरदार वृष्टी४परभणी तालुक्यातील बोरवंड बु़ परिसरात २३ सप्टेंबर रोजी पहाटे २ तास जोरदार वृष्टी झाल्याने या भागातील ओढे,नाले वाहत असून, शेतात पाणी साचले आहे़४रविवारी दिवसभर वातावरणात उकाडा होता़ मात्र पाऊस झाला नाही़ सोमवारी पहाटे मात्र मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे़अन् वाहून गेलेला शेतकरी बचावलापाथरी : तालुक्यातील खेर्डा गावाच्या जवळ असलेल्या नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पडलेल्या एका शेतकºयाने तब्बल ३०० मीटर अंतर पोहून पार करीत स्वत:चा जीव वाचविला आहे़२३ सप्टेंबर रोजी पहाटे तालुक्यात मुसळधार पाऊस झाला़ त्यामुळे पाथरी-आष्टी रस्त्यावरील खेर्डा गावाच्या नदीला पूर आला़ या पुरात रस्त्यावर तीन ते चार फुट पाणी आले होते़ सकाळी १० ते १५ शेतकरी शेतातून दूध घेवून येत असताना पुरामध्ये अडकले़ या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी दुसºया बाजुने दोरी बांधून आधार देण्याचा प्रयत्न करीत असतानाच एक शेतकरी पुराच्या पाण्यात पडला़ खेर्डा गावापासून खेडुळा गावाकडे जाणाºया रस्त्यावर हा नाला आहे़ या नाल्यातून पाथरी आणि मानवत तालुक्यातील पावसाचे पाणी वाहत रामपुरीमार्गे गोदावरी नदीला मिळते़ सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने पुलावर चार फुट पाणी आले होते़ खेर्डा गावातील काही शेतकरी दूध काढण्यासाठी शेतात गेले होते़ परत येत असताना पुराच्या पाण्यामुळे ते अडकून पडले़ पुलावरून तीन ते चार फुट पाणी असल्याने या शेतकºयांना गावाकडे येता येत नव्हते़ ही माहिती समजल्यानंतर गावातील काही ग्रामस्थ पुलाकडे धावले़ दोरीच्या सहाय्याने अडकलेल्या शेतकºयांना गावाकडे आणण्याचा प्रयत्न करीत असतानाच ज्ञानोबा बाबुराव उंडे (४५) हे खड्ड्यात अडकून पाण्यात वाहून गेले़ त्यानंतर जवळपास ३०० मीटर अंतरापर्यंत पोहत त्यांनी नाल्याच्या काठावर येवून स्वत:चा प्राण वाचविला़ विशेष म्हणजे ही सर्व घटना काही जणांनी मोबाईलमध्ये चित्रित केली आहे़
परभणी : सहा तालुक्यांना पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:23 AM