लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: न्यायालयाचे पकड वॉरंट असतानाही सहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेलू तालुक्यातील वालूर येथून ताब्यात घेतले आहे.जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा येथील रहिवासी आरोपी दासू उत्तम मस्के याला प्रथमश्रेणी न्यायालयाच्या न्याय दंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट बजावले होते. तरीही आरोपी सहा वर्षांपासून फरार होता. तो मुंबई येथे कामाला आहे व दिवाळीला वालूर येथे आला असल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून स्थागुशाच्या पथकाला मिळाली. त्यावरुन स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. मोईन कॅप्टन यांनी आरोपी दासू मस्के यास वालूर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला जिंतूर येथील न्यायालयात हजर केले.दरम्यान, अन्य एका प्रकरणात चांदज येथील आरोपी शेख इरफान शेख सुलेमान याच्यावरही न्यायालयाचे अटक वॉरंट होते. या आरोपीसही सपोउपनि.मोईन कॅप्टन यांनी चांदज येथून ताब्यात घेतले. त्याला जिंतूर येथे न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याची १२० दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
परभणी ; सहा वर्षांपासून फरार आरोपीस घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:14 AM