शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

परभणी : खडकपूर्णा काही भरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 12:58 AM

येलदरी धरणाच्या वरच्या बाजूला खडकपूर्णा धरण झाल्यापासून येलदरी धरण एकदा पूर्ण क्षमतेने भरले असून, यंदा तर केवळ ९ टक्के पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न तीव्र बनला आहे़

विजय चोरडिया ।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : येलदरी धरणाच्या वरच्या बाजूला खडकपूर्णा धरण झाल्यापासून येलदरी धरण एकदा पूर्ण क्षमतेने भरले असून, यंदा तर केवळ ९ टक्के पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न तीव्र बनला आहे़पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात २००९ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा धरण बांधण्यात आले आहे़ तेव्हापासून २०१३ हे वर्ष वगळता एकदाही येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही़ या धरणावर ६० हजार हेक्टर सिंचन क्षेत्र अवलंबून आहे़ त्यामुळे मागील आठ वर्षांत या भागातील शेतकरी पाण्याअभावी आर्थिक संकटात सापडला आहे़यावर्षी धरणात केवळ ९ टक्के पाणीसाठा आहे़ यात गाळ किती व पाणी किती हे सांगणेही कठीण आहे़ दहा वर्षापूर्वी पाटबंधारे विभागाने गाळाचे सर्वेक्षण केले होते़ त्यावेळी १४ टक्के गाळ असल्याचे स्पष्ट झाले़ आता हे प्रमाण १८ टक्क्यांपेक्षा जास्त झाले असावे़ करपरा या मध्यम प्रकल्पात ७६ टक्के पाणीसाठा आहे़ प्रकल्पाची क्षमता कमी असल्याने तो किती दिवस पुरेल हेही सांगता येत नाही़या दोन मध्यम प्रकल्पांसह पाटबंधारे विभागाच्या कवडा लघु तलावात ५२ टक्के, भोसी लघुतलावात ८ टक्के, मांडवी लघु तलावात ८० टक्के, दहेगाव लघुतलाव १५ टक्के, केहाळ लघु तलाव २१ टक्के, आडगाव लघुतलाव १७ टक्के, चिंचोली लघुतलाव १६ टक्के, देवगाव लघुतलाव ५७ टक्के, जोगवाडा लघु तलाव ९० टक्के, चारठाणा लघु तलाव ८३ टक्के तसेच पाडळी लघु तलावात ५५ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे़ खडकपूर्णा धरणात यावर्षी शून्य टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा असून, सिद्धेश्वर धरणात २५ टक्के पाणीसाठा आहे़ निसर्गाने यावर्षी पाठ फिरवल्याने भविष्यात तीव्र जलसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे़५ शहरे व २०० : गावांचा पाणीप्रश्न गंभीरयेलदरी व सिद्धेश्वर धरणाच्या पाण्यावर जिंतूर, हिंगोली, वसमत, पूर्णा व परभणी ही पाच प्रमुख शहरे अवलंबून आहेत़ याशिवाय पिंपळगाव २३ गाव पाणीपुरवठा योजना, १२ गाव वस्सा पाणीपुरवठा योजना, २० गाव पुरजळ पाणीपुरवठा योजना या प्रमुख योजनांसह येलदरी नदी काठावरील ३५ गावे, सिद्धेश्वर धरणाजवळील २० ते २५ गावे असे २०० पेक्षा जास्त गावांमध्ये परतीचा पाऊस पूर्ण क्षमतेने झाला नाही तर तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे़ विशेष म्हणजे, या दोन्ही धरण क्षेत्राखाली येणारी हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यापासून वंचित राहणार आहे़येलदरी धरणात उपलब्ध असलेल्या साठ्यापैकी पिण्याच्या पाण्यासाठी साठा आरक्षित करून शिल्लक पाणी राहिल्यास सिंचनासाठी सोडता येईल़ यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल़

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणीkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर