लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न भेडसावत आहे. त्या तुलनेत रोजगार हमी योजनेची कामे मात्र वाढत नसल्याने दुष्काळी परिस्थितीत स्थानिक मजुरांना कामाच्या शोधात भटकंती करावी लागत आहे़ एक आठवड्याच्या कालावधीत केवळ ८०७ कामे जिल्ह्यात सुरू होती़ त्यावर २७ हजार २७६ मजुरांच्या हाताला काम मिळाले़ संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती पाहता रोहयोच्या कामांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे़परतीचा पाऊस न झाल्याने यावर्षी जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली़ खरीप हंगामामध्ये शेवटच्या टप्प्यात पावसाने दडी मारली़ तेव्हापासून गायब झालेला पाऊस परतीच्या प्रवासातही जिल्ह्याला हुलकावणी देऊन गेला़ त्यामुळे जिल्ह्याची स्थिती अतिशय गंभीर झाली आहे़ रबीचा संपूर्ण हंगाम वाया गेल्याने शेतमजूर आणि इतर मजूर रोजगाराच्या शोधात शहरी भागाकडे येत आहेत़ गावामध्ये काम शिल्लक नसल्याने गावातून तालुक्याच्या ठिकाणी तालुक्यातून जिल्ह्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्यातून पुणे, मुंबई, औरंगाबादसारख्या मोठ्या शहरांकडे दररोज स्थलांतर होत आहे़मजुरांच्या हाताला गावातूच काम मिळावे आणि त्यातून मजुरांचे कुटूंब आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे अशा उद्देशाने महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना राबविण्यास सुरुवात केली़ या योजनेतून मजुरांच्या हाताला काम मिळण्याबरोबरच गावातील स्थानिक विकास कामेही मार्गी लागतात़ त्यामुळे शासनाचा दोन्ही बाजुंनी लाभ होतो़ दुष्काळी परिस्थितीमध्ये ही कामे मोठ्या प्रमाणात वाढतात़ मजुरांनाही त्या प्रमाणामध्ये मोबदला मिळत असल्याने या कामांवर मजुरांची संख्याही वाढत असल्याचे आतापर्यंतचे चित्र होते़ मात्र यावर्षी एकीकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे रोहयोची कामे मात्र ठप्प आहेत़ संपूर्ण जिल्हाभरात ग्रामपंचायतीमार्फत ५९८ आणि शासकीय यंत्रणांमार्फत केवळ २०९ कामे सुरू असून, त्यावर २७ हजार २७६ मजुरांना काम उपलब्ध झाले आहे़ २० ते २६ डिसेंबर या आठवड्यातील हा अहवाल असून, मजुरांची आणि कामांची संख्या लक्षात घेता रोहयोच्या कामांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़ परभणी जिल्ह्यामध्ये रोहयोकडे नियमित काम करणाऱ्या मजुरांची संख्या सुमारे दीड लाख (अॅक्टीव वर्कर्स) एवढी आहे़ त्या तुलनेत केवळ २७ हजार मजुरांनाच रोजगार मिळत असेल तर प्रशासनाने याबाबतीत गांभिर्याने घेण्याची गरज आहे़ परंतु, दुष्काळी परिस्थिितीतही प्रशासनाकडून प्रयत्न होत नसल्याचेच दिसत आहे़पाथरी, सोनपेठमध्ये सर्वात कमी कामेजिल्ह्यात पाथरी तालुक्यामध्ये २८ आणि सोनपेठ तालुक्यात २९ कामे रोहयोच्या माध्यमातून सुरू आहेत़ विशेष म्हणजे सोनपेठ तालुक्यामध्ये शासकीय यंत्रणेमार्फत एकही काम सुरू नाही़ त्याचबरोबर सेलू, परभणी या तालुक्यांतही शासकीय यंत्रणेचे काम सुरू नाही़ जिंतूर तालुक्यात दोन कामे सुरू आहेत़ याचाच अर्थ शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून कामे हाती घेण्याची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे़ प्रशासनाने ही कामे हाती घेतली तर मजुरांच्या हाताला काम मिळू शकते़ सद्यस्थितीमध्ये पूर्णा तालुक्यात सर्वाधिक २८४ कामे सुरू असून, त्या खालोखाल परभणी तालुक्यात १२१ आणि गंगाखेड तालुक्यात ११० कामे सुरू आहेत़साडेसात हजार कामे उपलब्धजिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ग्रामपंचायतीमार्फत ४ हजार ५३९ आणि यंत्रणांच्या माध्यमातून ३ हजार ३०७ अशी सुमारे ७ हजार ८४६ कामे उपलब्ध आहेत़४मजुरांनी कामाची मागणी करताच त्यांच्या हाताला काम दिले जाते, असे प्रशासनातर्फे सांगितले़ परंतु, परभणी जिल्ह्यातून कामाच्या शोधात मोठ्या शहरांमध्ये दररोज स्थलांतर होत असताना जिल्हा प्रशासनाकडे कामाची मागणी का होत नाही? असा प्रश्नही निर्माण होत आहे़४ मोठ्या प्रमाणात कामे शिल्लक असताना मजूर रोहयोकडे का येत नाही? या संदर्भातही प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे़सध्या सुरू असलेली कामेजिल्ह्यात सध्या विविध विभागांची कामे सुरू आहेत़ त्यामध्ये तुती लागवड, फळबाग लावगड, वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम, घरकुल बांधकाम, रोपवाटिका, सिंचन विहीर या कामांचा समावेश आहे़
परभणी : रोहयोच्या कामांची वाढेना गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 1:09 AM