लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक ५ आॅक्टोबर रोजी असल्याची पूर्व सूचना असतानाही अनेक विभागप्रमुखांनीच बैठकीकडे पाठ फिरविल्याने ही बैठक तहकूब करण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली़ यामुळे उपस्थित सदस्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला़जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक ५ आॅक्टोबर रोजी होणार असल्याची नोटीस आठ दिवसांपूर्वी जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या मंजुरीने सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने काढण्यात आली होती़ या संदर्भातील माहिती समितीच्या सर्व सदस्यांसह सर्व सभापती आणि विभागप्रमुखांना देण्यात आली होती़ त्यानुसार दुपारी २ च्या सुमारास जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठकीसाठी अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते व समितीचे सदस्य आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, शिक्षणाधिकारी आशा गरुड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बाळासाहेब शिंदे व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेख हे अधिकारी उपस्थित झाले़ जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज हे विभागीय आयुक्त कार्यालयातील महत्त्वाच्या बैठकीसाठी औरंगाबादला गेले असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत़शिवाय इतर अनेक विभागप्रमुख उपस्थित झाले नाहीत़ त्यामुळे अधिकारी येतील, असे समजून बैठकीस सुरुवात करण्यात आली़ त्यानंतर मागील बैठकीतील इतिवृत्तांत वाचण्यास सुरुवात करण्यात आली; परंतु, उर्वरित विभागप्रमुख येत नसल्याने उपस्थित सदस्य विष्णू मांडे यांच्यासह अन्य काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली़ अधिकारी उपस्थित राहत नसतील तर माहिती कोणाला विचारायची? जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे़ यासाठी उपाययोजना करण्याची गरज असताना माहिती देऊनही अधिकारी दांडी मारत असतील तर बैठकच कशाला घ्यायची? असा सूर उमटला़ त्यानंतर चर्चेअंती शुक्रवारची बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला़ आता पुढील बैठकीची तारीख जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड या ठरविणार आहेत़दरम्यान, आतापर्यंत पदाधिकारी किंवा सदस्य अनुस्थित राहिल्यास बैठक तहकूब करावी लागत होती़ आता चक्क अधिकारीच गैरहजर राहिल्याने बैठक तहकूब करण्याची वेळ जिल्हा परिषद पदाधिकाºयांवर आली आहे़ त्यामुळे पदाधिकाºयांचा अधिकाºयांवर धाक राहिला नाही की काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ या संदर्भात पदाधिकाºयांवर चिंतन करण्याची वेळ आली आहे़
परभणी : अधिकारी नसल्याने स्थायी समितीची बैठक तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:06 AM