लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा करीत काळाबाजार थांबविण्यासाठी धान्याची वाहतूक करणाºया वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असली तरी पुरवठा विभागाला या जीपीएस यंत्रणेवरून वाहनांचे लोकेशनच सापडत नसल्याचा प्रकार समोर आला आहे़ उपलब्ध माहितीनुसार तालुक्यात मागील तीन महिन्यांत एकदाही वाहनांचे लोकेशन तपासता आले नाही़ त्यामुळे काळा बाजार करणाºयांचे फावत असल्याचेच दिसत आहे़सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि काळ्या बाजारात जाणारे धान्य रोखून गोरगरीब जनतेला या धान्याचा थेट लाभ मिळावा, यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत़ लाभार्थ्यांना आधार क्रमांकावर धान्य वितरित केले जात आहे़ ई-पॉस मशीन प्रत्येक रेशन दुकानदारांना वितरित करण्यात आल्या़ त्याचप्रमाणे शासकीय गोदामातून धान्य घेऊन निघालेले वाहन दुकानापर्यंत पोहचते की नाही? याची पाहणी करण्यासाठी आणि या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक वाहनावर जीपीएस यंत्रणा बसविली आहे़ ही यंत्रणा पाथरी तालुक्यातही सुरू झाली़ त्यामुळे जीपीएस बसविलेल्या वाहनांचा थेट संबंध तहसील कार्यालयात असणे आवश्यक आहे़ मात्र तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात याविषयी फारसे कोणाला माहीत नसल्याचे दिसून आले़ तालुक्यात ७८ रेशन दुकाने असून, या दुकानांना धान्य पुरवठा करण्यासाठी सहा वाहने लावली आहेत़ या सहाही वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविली आहे़ या वाहनांद्वारे दुकानदारापर्यंत धान्य पोहचते की नाही? याची नोंद मात्र होत नाही़ पुरवठा विभागात या संदर्भात अधिक माहिती घेतली तेव्हा या यंत्रणेची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडे आहे़, असे सांगितले जाते़ त्यामुळे तालुक्यात धान्य वितरणाबाबत सर्व काही सुरळीत आहे असे दिसत नाही़ सध्या तरी वाहनांवर बसविलेली जीपीएस यंत्रणा शोभेची वस्तू ठरते की काय? अशी शंका निर्माण झाली आहे़तपासणीसाठी अधिकारीच उपलब्ध नाही४जिल्हाभरात स्वस्तधान्य वितरणाबाबत मोठ्या तक्रारी आहेत़ जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद रिक्त असून, या पदाचा अतिरिक्त कारभार निवासी उपजिल्हाधिकाºयांकडे आहे़ तसेच जिल्हाभरात नियंत्रण ठेवण्यासाठी असणारे तालुकास्तरावर स्वतंत्र नायब तहसीलदारांचे पद भरले असले तरी पाथरी येथील नायब तहसीलदार विवेक पाटील यांची जिंतूर येथे प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेच्या तपासणी कामात अडचणी निर्माण होत आहेत.कर्मचाºयांना प्रशिक्षण देणारस्वस्तधान्य वितरण प्रणालीतील वाहनांची जीपीएस सिस्टीमवर माहिती घेण्यासाठी तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना पासवर्ड दिले आहेत़ ते त्यांनी तपासावेत़ तसेच काही अडचणी असल्यास या संदर्भात पुरवठा विभागाला प्रशिक्षण देण्यात येणार आहे़-सखाराम मांडवगडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारीशासनाने धान्य वाहतूक करणाºया वाहनांवर जीपीएस यंत्रणा अनिवार्य केली आहे़ तालुक्यात धान्य वितरित करणाºया वाहनांवर ही यंत्रणा बसविली आहे़ मात्र आॅनलाईन सिस्टीमवर पाहता येत नाही़-निलेश पळसकर, नायब तहसीलदार पाथरी
परभणी : जीपीएस सुरू पण लोकेशन सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:54 PM