लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पूर्णा तालुक्यातील वझूर येथील अनुसया सार्वजनिक तालुका ग्रंथालयास राज्य शासनाचा राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट अ ग्रंथालय पुरस्कार ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.अनुसया सार्वजनिक तालुका ग्रंथालयास जाहीर झालेला हा पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते वाचनालयाचे अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार तसेच शरद पवार, रा.प. पवार, भास्कर पिंपळकर, काका कदम आदींनी स्वीकारला. या प्रसंगी राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.रामेश्वर पवार, राज्य ग्रंथालय संचालक राठोड, उपसचिव कहार यांची प्रमुख उपस्थिती होती. ५० हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या वाचनालयात २२ हजार पुस्तके असून, १६ दैनिके, पन्नासपेक्षा अधिक मासिके, पाचशेच्यावर सभासद असून, ग्रंथालयाची दोन मजली इमारत असून, स्वतंत्र महिला, बाल व ज्येष्ठ नगारिक वाचन कक्ष आहे.
परभणी : अनूसया ग्रंथालयास राज्य शासनाचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:52 AM