लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील बोरी येथील सहा वर्षीय बालिकेवर शाळेतून घरी येत असताना अज्ञात आरोपीने अत्याचार केल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली़ या घटनेच्या निषेधार्थ २ नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांनी बोरी गाव कडकडीत बंद ठेवून सकाळी १० वाजता कौसडी फाटा येथून निषेध रॅली काढली़शुक्रवारी ग्रामस्थांच्या वतीने बोरीत अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ व्यापारपेठ बंद ठेवण्यात आली़ ग्रामस्थांनी काळ्याफिती लावून घटनेचा निषेध केला़ आरोपींना अटक करून खटला जलदगती न्यायालयात दाखल करावा, पीडित मुलीच्या कुटूंबातील व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्यामार्फत पोलीस महासंचालकांना पाठविण्यात आले़ अत्याचार प्रकरणात बोरी ग्रामस्थ आक्रमक झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी शुक्रवारी गावाला भेट दिली़पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चाशुक्रवारी सायंकाळी ५ वाजता गावातील महिलांनी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढला़ यावेळी पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची भेट घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली़ या मोर्चात गावातील महिला व मुलींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता़ यावेळी उपाध्याय यांनी, या प्रकरणाची सहा पथकांमार्फत चौकशी सुरू असल्याचे आंदोलक महिलांना सांगितले़सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी लोकसहभागया घटनेमुळे गावांत मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी सांगितले़ त्यानंतर व्यापाºयांनी निधी जमा करण्यास सुरुवात केली आहे़ त्यात आ़ विजय भांबळे यांनी २ लाख रुपयांचा निधी दिला़ त्यानंतर ग्रामपंचायत ५ लाखांचा निधी देईल, असे जि़प़ सदस्य अजय चौधरी यांनी सांगितले़आज झरी बंदचे आवाहनबोरी येथील सहा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ ३ नोव्हेंबर रोजी झरी येथे बाजारपेठ बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे़ याबाबतचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले़
परभणी : बोरीत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 12:27 AM