लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : हात मदतीचा संकल्प राष्ट्र उभारणीचा निर्धार करणाºया परभणी येथील मित्र परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनी गंगाखेड शहरातील संत जनाबाई मंदिर परिसरातील आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबाला शिक्षण, आरोग्य व रोजगाराचा आधार देत जगण्याचे बळ दिले़समाजशील दातृत्व असणाºया लोकांच्या मदतीतून संकल्प राष्ट्र उभारणीचा मित्र परिवार गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यातील निराधार, गरजू व वंचित घटकांपर्यंत पोहोचून ज्यांना मदत व आधाराची गरज असते़ तसेच जेथे शासकीय, अशासकीय पातळीवरून मदत प्राप्त होत नाही, अशा समाजघटकांपर्यंत सातत्याने पोहोचून मदत देत जगण्याचे बळ देत असताना शेतातील नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या करणाºया गंगाखेड शहरातील सखाराम रोहिदास भुमरे यांच्या अकाली मृत्यूनंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कसलेही आर्थिक पाठबळ नसताना दोन लहान मुलांसह जीवन व्यतीत करणाºया चौत्राबाई सखाराम भुमरे यांना कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संकल्प राष्ट्र उभारणी मित्र परिवाराच्या वतीने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शिलाई मशीन भेट देत या कुटुंबाला जगण्याचे बळ दिले़ त्याचबरोबरच लहान मुलांच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारत शैक्षणिक साहित्य भेट दिले़ एवढ्यावरच न थांबता शहरातील डॉ़ शिवाजी निरस यांनी या कुटुंबाला पुढील एक वर्षे मोफत वैद्यकीय सेवा देण्याची जबाबदारी घेतली़या कामी कोमल गावंडे, सतीश शिंदे, धीरज सोनवणे, श्यामसुंदर निरस यांच्यासह समाजकल्याण कार्यालयातील समाजकल्याण अधिकारी अमित घवले, दिनकर जोशी, गृहपाल रामदास धोंगडे, विजय पकाने, प्रकाश कांबळे, विष्णू दराडे, सुरेश सरवदे, सुनील कांबळे, मुंजाभाऊ सोगे यांनी आर्थिक मदत केली़ आत्महत्याग्रस्त शेतकरी सखाराम भुमरे यांच्या कुटुंबाला कायमस्वरुपीचे आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून चौत्राबाई भुमरे यांना शिलाई प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सरपंच सीमाताई घनवटे यांनी घेतली़ तसेच राष्ट्र उभारणीची जबाबदारी म्हणून भुमरे कुटुंबास एक झाड भेट देऊन ते झाड वाढविण्याचा संकल्प भुमरे परिवारास दिला़ संकल्प राष्ट्र उभारणीचा मित्र परिवाराच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे़ यावेळी सतीश शिंदे, मंजुषा पद्देवाड, श्यामसुंदर निरस, संतोष शिंदे, धीरज सोनवणे, सुनील वराळे, विलास साखरे, मारोती जुंबडे, लक्ष्मण निरस, दत्ता गुरले, नारायण घनवटे, सखाराम बोबडे, धनंजय पवार, शिवाजी कांबळे, बाळासाहेब राखे, मुंजा भुमरे, राम ढेंबरे, मुक्तीराम आळसे, पिराजी भुमरे, अशोक भुमरे, मधुकर आव्हाड आदींची उपस्थिती होती़
परभणी : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना दिले जगण्याचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 1:15 AM