शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

परभणी : श्री विसर्जनासाठी जोरदार तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:45 AM

दहा दिवसांपासून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत असलेल्या श्री गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी होत आहे़ या पार्श्वभूमीवर स्थापना केलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते़ शहरातून वाजत-गाजत मिरवणुका काढून बाप्पांना निरोप दिला जातो़ या काळात कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात तगडा बंदोबस्त लावला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दहा दिवसांपासून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत असलेल्या श्री गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी होत आहे़ या पार्श्वभूमीवर स्थापना केलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते़ शहरातून वाजत-गाजत मिरवणुका काढून बाप्पांना निरोप दिला जातो़ या काळात कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात तगडा बंदोबस्त लावला आहे़जिल्ह्यात यावर्षी गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट होते़ पावसाच्या अनियमितपणामुळे पीक परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या समस्या निर्माण झाल्या होत्या़ अशाही परिस्थितीत गणेश भक्तांनी उत्साहात श्री गणरायांचे स्वागत केले़ परभणी शहरासह जिल्हाभरात ठिक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली़ त्याचप्रमाणे घरोघरी श्रींची स्थापना करून हा उत्सव साजरा केला जात आहे़१२ सप्टेंबर रोजी या उत्सावाची सांगता होत असून, जिल्हाभरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे़ तसेच विहीर, नदीपात्र, बंधारे आदी परिसरातही पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे़ परभणी शहरामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला़ शहरातील प्रमुख मार्गावर ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात़ सायंकाळी ६ वाजेपासून सुरू होणाऱ्या या मिरवणुका दुसºया दिवशीच्या पहाटेपर्यंत चालतात़मिरवणूक काळात युवकांचा उत्साह शिगेला जातो़ या उत्साहाच्या भरात अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाने प्रतिबंधही घातले आहेत़ शहरातील विसर्जन मार्गावर उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ त्याचप्रमाणे संपूर्ण मार्गावर ठिक ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉर्इंट लावले आहेत़गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान, महानगरपालिकेसह विविध राजकीय पक्षांच्या वतीने गणेश भक्तांचे स्वागत केले जाते़ शिवाजी चौक, गुजरी बाजार या ठिकाणी स्टेज उभारून गणेश भक्तांचा उत्साह वाढविला जातो़ एकंदर गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांसह जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासनानेही तयारी केली आहे़डॉल्बीच्या वापरास बंदी४श्री गणेश विजर्सन मिरवणुकी दरम्यान, डॉल्बी साऊंड सिस्टीम वापरण्यास जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी एका आदेशाने बंदी घातली आहे़ पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिलेल्या अहवालावरून आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे़ त्यामुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांना डॉल्बीचा आवाज म्युट करूनच मिरवणूका काढाव्या लागणार आहेत़ आरोग्यास बाधा पोहचू नये, या उद्देशाने जिल्हाधिकाºयांनी हा प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे़जलशुद्धीकरण केंद्र : उभारले बॅरिकेटस्४शहरातील सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेने जलशुद्धीकरण केंद्र परिसरात ५० बाय ५० फुट आकाराचा आणि १८ फुट खोलीचा हौद तयार केला आहे़ या ठिकाणी गणेश भक्तांची गर्दी होवू नये, यासाठी बॅरिकेटस् उभारण्यात आले आहेत़ जलशुद्धीकरण केंद्र परिसरात येण्यासाठी आणि गणरायाच्या विसर्जनानंतर परत जाण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग तयार केले आहेत़४ बुधवारी या संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली़ तसेच हौद पाण्याने भरून घेण्यात आला़ या ठिकाणी दोन्ही प्रवेशद्वारांंवर प्रत्येकी १ आणि विसर्जन हौदाच्या ठिकाणी २ असे ४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ त्याचप्रमाणे पोलिसांचा बंदोबस्तही राहणार आहे़सीसीटीव्ही कॅमेºयांची राहणार नजरगणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू असतानाच परभणी शहरात प्रमुख चौक आणि मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ काही महिन्यांपूर्वी शहरामध्ये या कॅमेºयांची संख्या वाढविण्यात आली असून, कॅमेºयांच्या माध्यमातून अनुचित प्रकारांवर पोलीस यंत्रणा नजर ठेवणार आहे़निर्माल्य, मूर्तींचे करणार संकलन४महानगरपालिकेने गणेश विजर्सनासाठी जय्यत तयारी केली आहे़ शहरातील विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून, या मार्गावर लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे़ त्याचप्रमाणे घरगुती गणेश मूर्ती एकत्रित करून महापालिका स्वत: जलशुद्धीकरण केंद्राजवळ असलेल्या हौदात या मूर्तीचे विजर्सन करणार आहे़ दहा दिवस जमा झालेल्या निर्माल्याचा दुरुपयोग होवू नये, या उद्देशाने ठिक ठिकाणी विसर्जनस्थळी निर्माल्य कलश ठेवण्यात आला आहे़ गणेश भक्तांनी या निर्माल्य कलशातच निर्माल्य टाकावे़ बालविद्या मंदिर नानलपेठ, जिंतूर रोडवरील गणपती चौक, दर्गा रोडवरील कृत्रिम रेतन केंद्र, गांधी पार्क, खंडोबा बाजार, धार रोड, दुर्गादेवी मंदिर समाधान कॉलनी, विद्यापीठ गेट, देशमुख हॉॅटेल गणपती चौक आणि शिवशक्ती बिल्डींग वसमत रोड या ठिकाणी घरगुती गणपती संकलन केंद्र स्थापन केले आहेत. नागरिकांनी या संकलन केंद्रातच गणेशमूर्ती द्याव्यात, असे आवाहन मनपाने केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGanesh Mahotsavगणेशोत्सवPoliceपोलिस