लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: येथील जि.प. बहुविध प्रशाला बंद करण्याचा घाट घातला जात असून याविरुद्ध शिक्षक, विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शहरातील शनिवार बाजार येथून घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. या आंदोलनात अल्पसंख्याक विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा परिषद बहुविध प्रशाला ही निजामकालीन शाळा आहे. ही शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शाळा बंद करण्याच्या धोरणाविरुद्ध हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जि.प.बहुविध प्रशालेची यापूर्वीची जागा जि.प.ने इमारत बांधकामासाठी घेतली आहे. या शाळेत मुस्लिम अल्पसंख्याक व मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र शाळा बंद करण्याच्या हालचाली असून त्या थांबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर लोकश्रेय मित्र मंडळाचे अध्यक्ष सलीम इनामदार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नसरीन बेगम शेख मैनोद्दीन, सय्यद फारुख स.अहमद, स.रहेबर स.जिलानी, सय्यद ताहेर सय्यद खुर्शिद, शेख अजीम शेख इब्राहीम, सुलोचनाबाई सोनवणे आदींची नावे आहेत.
परभणी : विद्यार्थी, शिक्षकांनी काढला जिल्हा कचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:29 AM