लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथे मानव विकास मिशन अंतर्गत बससेवा सुरू करावी, अशी मागणी वारंवार केल्यानंतरही त्यास दाद मिळत नसल्याने २० आॅगस्ट रोजी सकाळी ७ ते ८ यावेळेत संतप्त झालेल्या धर्मापुरी येथील विद्यार्थिनींनी परभणी- जिंतूर रस्त्यावरील धर्मापुरी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल १५ बस या विद्यार्थिनींनी रोखून धरल्याने एक तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.तालुक्यातील धमार्पुरी या गावातील सुमारे १०० विद्यार्थिनी शिक्षणासाठी दररोज परभणी येथे येतात. मागील वर्षी या गावात मानव विकासची बस दररोज येत होती. त्यामुळे विद्यार्थिनीच्या शिक्षणात कोणताही अडथळा आला नाही. मात्र चालू शैक्षणिक वर्षात मानव विकासची बससेवा बंद करण्यात आली. मानव विकास अंतर्गत बससेवा तत्काळ सुरू करावी व विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी गावकऱ्यांनी एस. टी. महामंडळ आणि जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी केली. मात्र गावात कोणतीही बस थांबत नसल्याने विद्यार्थिनी संतप्त झाल्या. २० आॅगस्ट रोजी सकाळी ७ ते ८ यावेळेत धमार्पुरी फाट्यावर मुख्य मार्गावरील बस रोखून धरल्या.एक तासाच्या आंदोलनात १५ बसेस रोखरुन धरण्यात आल्या. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनाची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकºयांची समजूत काढली. जिल्हाधिकारी व एस.टी. महामंडळ प्राशासनाला आज आणखी एकदा निवेदन देऊ, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे पोलीस कर्मचाºयांनी सांगितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी चेअरमन नितीन कदम, मावळा संघटनेचे गोविंद कदम, तानाजी कदम, रमेश कदम यांच्यासह विद्यार्थिनी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थिनींचे होत आहे शैक्षणिक नुकसान४धर्मापुरी येथून परभणी येथे शिक्षणासाठी येणाºया विद्यार्थिनींना सकाळी ७.१५ वाजता गावातून निघावे लागते. त्यानंतर बसची वाट पहात ताटकळत थांबावे लागते.४त्यामुळे पहिल्या २ तासिका बुडतात. दररोज हा प्रकार होत असल्याने विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे.४केवळ बससेवा नसल्याने विद्यार्थिनींच्या तासिका बुडत आहेत़
परभणी : बससेवेच्या मागणीसाठी विद्यार्थिनींनी रोखल्या बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:42 AM