लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : एफआरपी कायद्याची अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम अदा करावी, या मागणीसाठी सोमवारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकºयांना उसाचे पैसे देताना एफआरपी कायद्याची अंमलबजावणी कारखानदार करीत नाहीत. २०१७ मध्ये एफआरपी प्रमाणे भाव जाहीर न करता कारखाने सुरु करण्यात आले. २०१८ मध्येही भाव जाहीर करण्यात आला नाही.तसेच २०१७ च्या गळित हंगामातील उसाच्या बिलाची रक्कम अद्यापही शेतकºयांना मिळाली नाही. यावर्षी गाळप हंगाम सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला; परंतु, कारखानदारांनी शेतकºयांना एफआरपीची रक्कम अदा केली नाही. जिल्ह्यात दुष्काळ असतानाही कारखानदारांनी एफआरपीपेक्षा ४०० रुपये कमी दराने ऊसतोडणी सुरु केली आहे. तेव्हा कारखानदारांची चौकशी करुन कारवाई करावी व शेतकºयांच्या खात्यावर एफआरपीप्रमाणे पैसे द्यावेत इ. मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कदम, मुंजाभाऊ कदम, अण्णा जोगदंड, माऊली जोगदंड, गोविंद जबडे, विश्वंभर गोरवे, आत्माराम चौरे, कृष्णा भोसले, त्र्यंबक सुरवसे, राजेभाऊ काकडे यांच्यासह शेतकरी बहुसंख्येने सहभागी झाले होते.
परभणी :ऊस बिलासाठी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:12 AM