लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विजेच्या तारांमध्ये स्पार्किंग होऊन पिकांचे नुकसान होत असल्याच्या घटना जिल्ह्यात होत आहेत़ दोन दिवसांमध्ये दोन ठिकाणी या घटना घडल्या असून, शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे़तालुक्यातील पिंगळी शिवारातील एका शेतकºयाचा ऊस शॉर्टसर्किटने जळाल्याची घटना २५ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली़ परभणी तालुक्यातील पिंगळी शिवारात गट क्रमांक १८४ मध्ये भगवान आवचार यांचे शेत आहे़ त्यांच्या शेता शेजारीच वीज कंपनीची डीपी बसविलेली असून, २५ आॅक्टोबर रोजी सकाळी ९़३० वाजेच्या सुमारास या डीपीहून गेलेल्या तारांमध्ये अचानक पार्किंग झाली़ तारातून पडलेल्या ठिणग्या उसाच्या पिकावर पडल्याने चार एकर क्षेत्रावरील ऊस जळून गेला आहे़ यात अंदाजे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे़ या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे़सोनपेठ तालुक्यातील खडका येथेही २८ आॅक्टोबर रोजी दीड एकर ऊस जळाल्याची घटना घडली़ खडका शिवारात भगवान यादव यांनी सर्व्हे नंबर १२ मध्ये उसाची लागवड केली आहे़२८ आॅक्टोबर रोजी विद्युत रोहित्राच्या वायरमध्ये स्पार्किंग होऊन आगीची घटना घडली़ यात भगवान यादव यांचा दीड एकर ऊस जळून खाक झाला आहे़ अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकºयाने दिली़
परभणी : दोन शेतकऱ्यांचा जळाला ऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:20 AM