लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, या अनुषंगाने जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा स्वयंसेविका यांच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात येत असून १८ ते २६ मार्च या कालावधीत जिल्ह्यात २ लाख ७ हजार १८ नागरिकांचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये २५ हजार १५६ नागरिक देशांतर्गत मोठ्या शहरातून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील १ हजार ८२ नागरिकांना श्वसन विकार असल्याचे समोर आले आहे.कोरोना प्रादूर्भाव प्रतिबंधात्मक सर्व्हेक्षणांतर्गत जिल्ह्यात १८ मार्चपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नऊही तालुक्यात सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार २६ मार्चपर्यंत २ लाख ७ हजार १८ नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामध्ये १ हजार ८२ नागरिकांना श्वसन विकार असल्याचे आढळून आले. त्यामध्ये ताप, कोरडा खोकला व श्वास घेण्यास त्रास होणे आदी बाबींचा समावेश आहे. जिल्ह्यात मोठ्या शहरांमधून २५ हजार १५६ नागरिक दाखल झाले आहेत. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यात ४ हजार १८, जिंतूर तालुक्यात ५ हजार ७८९, मानवत तालुक्यात २ हजार ५३५, पालम तालुक्यात २ हजार ६५७, परभणी तालुक्यात ३ हजार २२८, पाथरी तालुक्यात २ हजार ६३, पूर्णा तालुक्यात २ हजार ३४३, सेलू तालुक्यात १२, सोनपेठ तालुक्यात १ हजार ७०८ एवढ्या नागरिकांची सर्व्हेक्षणामध्ये नोंद झाली आहे. या व्यतिरिक्तही अनेक नागरिक जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत; परंतु, त्यांची नोंद नाही.५५९ नागरिकांना दवाखान्यात दाखल होण्याच्या सूचना४जिल्ह्यातील १ हजार ८२ नागरिकांना श्वसन विकार असल्याचे आढळून आले होते. त्यातील ५५९ नागरिकांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी संदर्भित करण्यात आले असल्याची माहिती या संदर्भात देण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.
परभणी : दोन लाख नागरिकांचे सर्व्हेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:00 PM