शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

परभणी : तलाठी राजू काजे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 12:51 AM

चार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोषी आढळल्याने तलाठी राजू ऊर्फ लक्ष्मीकांत काजे यांना उपविभागीय अधिकारी डॉ.सूचिता शिंदे यांनी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. या संदर्भातील आदेश परभणी तहसील कार्यालयास सोमवारी निर्गमित करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : चार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोषी आढळल्याने तलाठी राजू ऊर्फ लक्ष्मीकांत काजे यांना उपविभागीय अधिकारी डॉ.सूचिता शिंदे यांनी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. या संदर्भातील आदेश परभणी तहसील कार्यालयास सोमवारी निर्गमित करण्यात आला.जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी कर्मचाऱ्यांना आधार बेसड् बायोमॅट्रिक उपस्थिती लागू करण्याचा निर्णय घेतला असून तलाठ्यांना दोन वेळा नेमून दिलेल्या सज्जा व मंडळाच्या ठिकाणी आधार बेसड् बायोमॅट्रिक उपस्थिती नोंदविण्याचे सूचित केले आहे; परंतु, वांगी येथील तलाठी लक्ष्मीकांत काजे यांची नोव्हेंबर २०१८ ते डिसेंबर २०१८ दरम्यान उपस्थिती तपासणी केली असता नोव्हेंबर महिन्यात काजे हे ७ दिवस विनापरवाना गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाºयांचा आदेश भंग केल्याचे स्पष्ट झाले.दुसºया प्रकरणात परभणी येथील माणिक बाबुराव कानडे यांनी जिल्हाधिकाºयांकडे त्यांच्या शेती गट नं.२८१ च्या जमिनीचे बोगस फेरफार क्रमांक ३७४२ व ७८९२ रद्द करुन त्यांचे नाव लावण्याची तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने नमूद शेत जमिनीच्या फेरफारचे अवलोकन केले असता सदर फेरफार हा हक्कसोड पत्र ४ सप्टेंबर १९९० च्या आधारे हक्कसोड पत्र लिहून घेणाºया धारकांपैकी दोघांनी अर्ज दिल्यानंतर सदर हक्कसोड पत्रात परभणी येथील सर्व्हे नं.२१४/१, १८९/२, १९४, १६८/२, १६३/२ व १९३ या जमिनीचा उल्लेख असताना सदर जमिनीचा अमल न घेता सर्व्हे नं.२८१ चा सदर फेरफार घेतला आहे. तो घेताना मालकी हक्कातील संबंधितांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नाही. तसेच हक्कसोडपत्र करुन घेणाºयापैकी उर्वरित दोन हक्कसोड धारकांचा अर्ज घेतला नाही. केवळ दोन हक्कसोड धारकांच्या कथित अर्जाद्वारे प्रस्तुतचा फेरफार चुकीच्या व गैरकायदेशीर नोंद करुन मंडळ अधिकारी परभणी यांनी तो मंजूर केला आहे.४तिसरे प्रकरणही जमीन फेरफारचे आहे. त्यात परभणी येथील शेख हमीद शेख रहीम व इतरांच्या सर्व्हे नं.११६ या जमिनीच्या ७९६० फेरफार दाखल अर्धन्यायीक प्रकरणाच्या अनुषंगाने संबंधितांना नोटीस बजावणे आवश्यक असताना व विवादग्रस्त प्रकरण म्हणून परभणी मंडळ अधिकाºयांकडे सुनावणीसाठी वर्ग करणे आवश्यक असताना तशी कारवाई काजे यांनी केली नाही व परभणी मंडळ अधिकाºयांनी १६ फेब्रुवारी २०१८ रोजी तो गैरकायदेशीररित्या मंजूर केला आहे.४चौथे प्रकरण धर्मापुरी सज्जाअंतर्गत घडले असून २०१७ च्या हंगामात कापूस पिकाच्या नुकसानबाधित शेतकºयांच्या बँकनिहाय याद्या तयार करण्याच्या सूचना देऊनही काजे यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान वाटप झाले नाही. या प्रकरणातही काजे दोषी आढळले आहेत. या चारही प्रकरणावरुन तलाठी राजू काजे यांना उपविभागीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय परभणी तहसील कार्यालय राहणार आहे.

 

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभाग