मोहन बोराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी ): तालुकास्तरावरून धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यातून माल वाहतूक बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे़ या निर्णयानंतर रेल्वेस्थानकातील बुकींग कार्यालयाला टाळे लागल्याचे चित्र सोमवारी पहावयास मिळाले आहे़नांदेड ते मुंबई या लोहामार्गावरून तपोवन, नंदीग्राम, देवगिरी आदी एक्सप्रेस रेल्वेगाड्या धावतात़ या रेल्वे गाड्यातून तालुक्यातील मत्स्य आणि फळांची निर्यात मोठ्या प्रमाणात होते़ प्राप्त माहितीनुसार नांदेड विभागाच्या महाप्रबंधक कार्यालयातून काढण्यात आलेल्या आदेशानुसार तालुकास्तरावरून धावणाºया एक्सप्रेस रेल्वे गाड्यातून होणारी मालाची वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ या निर्णयामुळे शेतकºयांचा माल महानगरापर्यंत नेण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे़ सेलू तालुक्यातून लिंबू, मासे व इतर माल दररोज कल्याण, दादर, मुंबई आदी ठिकाणी तपोवन एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस आदी रेल्वे गाड्यातून पाठविण्यात येतो़ महानगरात चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आणि व्यापारी आपला माल विक्रीसाठी महानगराकडे पाठविण्यासाठी रेल्वे सुविधेचा वापर करित होते; परंतु, रेल्वे विभागाने जंक्शन स्टेशनशिवाय इतर स्टेशनवरून होणारी निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातून महानगराकडे होणारी निर्यात बंद झाली आहे़ तसेच आयातही बंद झाल्याने शेतकरी आणि व्यापाºयांना परभणी रेल्वेस्थानकावरून आपल्या मालाची आयात आणि निर्यात करावी लागत आहे़ सेलू हे जिल्ह्यातील रेल्वेचे महत्त्वपूर्ण रेल्वेस्थानक मानले जाते़ नांदेड आणि मुंबई या मार्गावर ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या येथे मोठ्या प्रमाणावर आहे़ तसेच माल वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते; परंतु, रेल्वे विभागाने एक्सप्रेस रेल्वेगाड्या वेळेवर धावाव्यात हे कारण देऊन तालुकास्तरावरील रेल्वेस्थानकातून होणारी मालाची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयाचा फटका केवळ व्यापारी आणि शेतकºयांनाच न बसता रेल्वेस्थानकावर हमाली करणाºया कामगारांनाही बसला आहे़ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेलू तालुक्यातून मुंबई येथे दररोज १० ते १५ ढाग मासे मुंबई, दादर, गोरखपूर आदी शहरात पाठविले जातात़ त्याचबरोबर तालुक्यातील राधेधामणगाव येथील कागदी लिंबाची तर दिल्लीपर्यंत रेल्वे मार्गाने निर्यात केली जाते़ रेल्वेविभागाने तालुकास्तरावरून धावणाºया एक्सप्रेस रेल्वे गाड्यांची माल वाहतूक रोखल्याने आयात आणि निर्यातीवर मोठा परिणाम जाणवत आहे़ सेलू रेल्वेस्थानकावर सोमवारी माल वाहतूक बुकींग संदर्भात स्टेशन मास्टर विजयकुमार प्रसाद यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा विषय बुकींग कार्यालयांतर्गत येत असल्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला़ आयात आणि निर्यात बंद झाल्याने बुकींग कार्यालयासही टाळे लागल्याने या संदर्भात प्रतिक्रिया मिळू शकल्या नाही़शेतकरी, हमाल हतबल४सेलू येथून होणारी मालाची आयात आणि निर्यात बंद झाल्याने फळ विक्रेते, शेतकरी आणि मस्त्य उत्पादक नवीन समस्यांना तोंड देत आहेत़ रेल्वे विभागाच्या या निर्णयाचा फटका हमाली व्यवसाय करणाºया कामगारांना बसला आहे़ दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाºया शेतकºयांना रेल्वेच्या निर्णयाने आर्थिक फटका बसत आहे़ माल वाहतूक परभणी येथून शेतकरी आणि व्यापाºयांना करावी लागत आहे़ तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील विविध जातीचे मासे दररोज मुंबई व इतर शहरात रेल्वेद्वारे पाठविण्यात येतात़ आता या निर्णयामुळे मत्स्य उत्पादकांना परभणी स्टेशनवरून माल वाहतूक करावी लागत असल्याची प्रतिक्रिया देविदास कुटारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ दरम्यान हमाली व्यवसाय करणाºया कामगारांवरही या निर्णयामुळे बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे़
परभणी : तालुकास्तरीय माल वाहतूक झाली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:44 PM