शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

परभणी : तंटामुक्त गाव समित्या कागदावरच राहिल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:29 AM

गावातील तंटे गावातच मिटवून ग्रामस्थांनी शांततेकडून समृद्धीकडे जावे, या हेतुने शासनाने तंटामुक्त समित्याची स्थापना केली. मात्र तालुक्यातील विविध गावात झालेली भांडणं, तंटे मिटवण्यासाठी या समितीला अपयश येत असल्याने ग्रामस्थांना पोलीस ठाण्याचे दार ठोठवावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील तंटामुक्ती समित्या केवळ कागदावरच उरल्या असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): गावातील तंटे गावातच मिटवून ग्रामस्थांनी शांततेकडून समृद्धीकडे जावे, या हेतुने शासनाने तंटामुक्त समित्याची स्थापना केली. मात्र तालुक्यातील विविध गावात झालेली भांडणं, तंटे मिटवण्यासाठी या समितीला अपयश येत असल्याने ग्रामस्थांना पोलीस ठाण्याचे दार ठोठवावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील तंटामुक्ती समित्या केवळ कागदावरच उरल्या असल्याचे दिसून येत आहे.पोलिसांवरील कामाचा वाढता ताण कमी व्हावा, गावातील तंटे गावाताच मिटावेत, हा चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेऊन तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या पुढाकारातुन राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त योजना सुरु करण्यात आली. या समित्यांचे अधिकार कोणते, तंटे कसे मिटवावेत, ग्रामस्थ पोलिसांकडे न जाता समितीकडे कसे येतील, याबाबत समितीचे पदधिकारी सध्याही अज्ञभिज्ञ आहेत. समितींच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या अधिकाराची परिपूर्ण जाणीव नसल्याने बहुतांश गावातील तंट्यांच्या तक्रारी ठाण्यात येत आहेत. यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढत आहे. ग्रामीण भागात गावपातळीवर सभेचे आयोजन करुन जनजागृती करणे आवश्यक आहे; परंतु, तसे होताना दिसत नाही. गावातील वाद पोलीस ठाण्यात आला की, अनेकजण याचा गैर फायदा घेतात. शासनाच्या या चांगल्या योजनेची प्रभावीपणे अमलबजावणी होताना दिसत नाही. गावातील तंटे गावातच मिटविल्यास त्या गावाला शासनाकडून लाखो रुपयांची बक्षिसेही दिली जातात. समितीचे पदधिकारी बक्षीस आपल्याच गावाला मिळावे, यासाठी धडपड करतात. मात्र गावातील तंटे मिटवताना दिसत नाहीत. गावातल्या गावात अबोला नको म्हणून गावच्या समितीतील पदधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे तंटामुक्त समितीना तंटा मिटवण्यासाठी मानवत तालुक्यात अपयश येत आहे.वरिष्ठांचे दुर्लक्ष: तालुक्यात तंटामुक्त मोहीम थंडावलीगावातील तंटे गावातच मिटवावेत, गावोगावी शांतता नांदावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. त्यानुसार प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या. या मोहिमेला सुरुवातीला प्रतिसादही मिळाला; परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मानवत तालुक्यात तंटामुक्त मोहीम थंडावली असून गावातील तंटामुक्त समित्या केवळ कागदांवरच राहिल्या असल्याने तंट्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे तंटामुक्तीची चळवळ गतीमान करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. छोट्या-मोठ्या कारणावरून निर्माण होणारे तंटे वेळीच मिटवले नाहीत तर ते मोठे स्वरूप धारण करतात. त्यानंतर क्षुल्लक कारणावरून पोलिस प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागते. यात वेळ, पैसा, मानसिक स्वास्थ गमवण्याची वेळ येते.४यास दारू हे एक कारण आहे. त्यामुळे दारूचे समूळ उच्चाटन व्हावे, गावा-गावांत शांतता नांदावी, यासाठी दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी २००६ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. मोहीम यशस्वीरीत्या सुरू झाल्यानंतर काही वर्षे ती प्रभावीपणे राबविण्यात आली. मात्र आता जिल्ह्यासह तालुक्यात ही मोहीम थंडावल्याचे दिसून येत आहे.पोलीस प्रशासनाचे दुर्लक्षतंटामुक्ती मोहिमेकडेच पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे तंटे वाढत असून तंटामुक्त समिती अध्यक्ष व समित्याही याबाबत उदासीन आहेत. खºया अर्थाने आदर्श गावाची निर्मिती करावयाची असेल तर राज्यशासनाने याकडे लक्ष देऊन पुन्हा एकदा तंटामुक्त चळवळीला उभारी देण्याची गरज आहे. यामुळे गाव परिसरात वाद, गावातच मिटू शकतील. ज्यामुळे शासनाचा या योजनेमागचा उद्देश सफल होईल.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसliquor banदारूबंदी