शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

परभणी : कडब्यासह टेम्पो जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 11:53 PM

कडब्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला वीज तारांचा स्पर्श झाल्याने कडब्यासह टेम्पो जळून खाक झाल्याची घटना ९ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील आरखेड शिवारात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : कडब्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला वीज तारांचा स्पर्श झाल्याने कडब्यासह टेम्पो जळून खाक झाल्याची घटना ९ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील आरखेड शिवारात घडली.आरखेड शिवारात चाºयाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारात चाºयाला मागणी वाढली आहे. आरखेड शिवारात काही शेतकऱ्यांनी चाºयाचे उत्पादन घेतले असून या ठिकाणाहून चारा विक्री होत आहे. गुरुवारी हिप्परगा येथील काही शेतकरी आरखेड येथे आले. त्यांनी या ठिकाणी चारा विकत घेऊन तो टेम्पोमध्ये भरला. हा टेम्पो परतीच्या प्रवासाला जात असताना शिरपूर रस्त्यावर विजेच्या तारा खाली लोंबकाळात होत्या. या ताराखालून टेम्पो पुढे नेत असताना वीज तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन आगीचा भडका उडाला. त्यात टेम्पोतील कडब्याने पेट घेतला. कडबा पेटल्याची बाब काही वाहनधारकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी टेम्पोचालकाला माहिती दिली. टेम्पोचालकाने हा टेम्पो थांबवून खाली उडी घेतली. टेम्पोतील इतर शेतकºयांनाही खाली उतरविले. बघता बघता आगीचे लोट वाढत गेले. जवळपास पाण्याची व्यवस्था नसल्याने आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे आग विझवणे शक्य झाले नाही. त्यामुळे शेतकºयांसमोर हा टेम्पो आणि त्यातील कडबा जळून खाक झाला. आगीमध्ये टेम्पो पूर्णत: जळाल्याने त्याचा क्रमांक उपलब्ध झाला नाही. शेतकºयांनाही या संदर्भात माहिती नव्हती. दरम्यान, टेम्पोचा जागेवरच कोळसा झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.झरी येथे आखाड्याला आग : शेती औजारे जळाली, चार जनावरे भाजली, हजारोंचे नुकसानपरभणी तालुक्यातील झरी येथील शेतातील आखाड्याला आग लागल्याने चार जनावरे भाजली असून शेती औजारे जळून खाक झाली. ६ मे रोजी ही घटना घडली. झरी शिवारातील गट नं.६९० मध्ये धोंडीराम बाबुराव देशमुख यांचा आखाडा आहे. या आखाड्यात जनावरे बांधलेली होती. आखाड्याशेजारीच शेतीची औजारे ठेवली होती.सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या आखाड्याने अचानक पेट घेतला. परिसरामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने आग विझविताना अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान, या घटनेत गाय, म्हैस व दोन वासरे भाजली आहेत.तर सोयाबीन, हरभरा आणि तुरीचा भुसा जळून खाक झाला. कोळपे, औत, तिफन, स्पिंकलर आदी शेतीचे साहित्यही जळून खाक झाल्याची माहिती देशमुख यांनी दिली. घटनेनंतर तलाठी काळे यांनी पंचनामा केला असून परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.घटनांत वाढ४पालम तालुक्यासह इतर तालुक्यांमध्ये महिनाभरापासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वीच कडबा घेऊन जाणाºया एका टेम्पोला सेलू तालुक्यातील देवगाव फाटा परिसरात आग लागली होती. तसेच पूर्णा, मानवत, पाथरी तालुक्यात कडब्याच्या गंजीने पेट घेतल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.४उन्हाची तीव्रता वाढत असल्याने कडबा पेट घेत असून काही भागात वीज वितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.४शेतातील उभ्या उसाला आग लागल्याच्याही घटना घडल्या आहेत. एकंदर या उन्हाळ्यात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगFarmerशेतकरी