शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

परभणी : दुष्काळी यादीत आणखी दहा मंडळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 12:12 AM

जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी २४ मंडळांमध्ये यापूर्वीच गंभीरस्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला असून, पाऊस आणि एकंदर परिस्थितीचा विचार करता आणखी दहा मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती नाजूक झाल्याने या मंडळांचाही गंभीर दुष्काळाच्या यादीत समावेश करावा, असा विनंतीवजा अहवाल जिल्हा प्रशसनाने शासनाकडे पाठविला असून या दहा पैकी सात मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी २४ मंडळांमध्ये यापूर्वीच गंभीरस्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला असून, पाऊस आणि एकंदर परिस्थितीचा विचार करता आणखी दहा मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती नाजूक झाल्याने या मंडळांचाही गंभीर दुष्काळाच्या यादीत समावेश करावा, असा विनंतीवजा अहवाल जिल्हा प्रशसनाने शासनाकडे पाठविला असून या दहा पैकी सात मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.यंदा परतीचा पाऊस झाला नसल्याने जिल्हाभरात परिस्थिती गंभीर झाली आहे. प्रकल्पांमध्ये पाणीसाठा उपलब्ध नसल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. याशिवाय रबी पेरण्या झाल्या नाहीत आणि खरीप हंगामातही नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत होती. राज्य शासनाने यावर्षी दुष्काळ जाहीर करण्याचे निकष बदलले आहेत.या निकषानुसार पहिल्या टप्प्यात पावसाच्या सरासरीवर आधारित जिल्ह्यातील चार तालुके गंभीर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोग केल्यानंतर जाहीर केलेल्या गंभीर दुष्काळाच्या यादीत सहा तालुक्यांचा समावेश झाला. मात्र गंगाखेड, पूर्णा आणि जिंतूर या तालुक्यांचा समावेश झाला नाही.राज्य शासनाने तालुकानिहाय पावसाचाच विचार करुन दुष्काळी तालुक्याची यादी जाहीर केली. त्यात तीन तालुक्यांचा समावेश झाला नाही. मात्र मंडळ निहाय विचार करता दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यातील अनेक मंडळांमध्येही गंभीर स्वरुपाची परिस्थिती आहे. या मंडळांमध्येही कमी पाऊस झाला असून, पिकांचे उत्पादनही झाले नाही. त्यामुळे मंडळांचा विचार करता आणखी दहा मंडळे दुष्काळी यादीत समाविष्ट होणे अपेक्षित आहे. राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या सहा तालुक्यातील २४ मंडळांचा दुष्काळाच्या यादीत समावेश आहे. मात्र, उर्वरित तीन तालुक्यांपैकी गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यातील दहा मंडळांमध्येही पावसाचे प्रमाण कमी असून, या मंडळांचाही दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश करावा, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे. त्यामुळे आता या मंडळांविषयी काय निर्णय होतो, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.जिंतूर, गंगाखेडमध्ये परिस्थिती नाजूकच४जिंतूर अणि गंगाखेड या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पिकांची वाढ व्यवस्थित झाली नसल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांप्रमाणेच या दोन्ही तालुक्यातील परिस्थिती असून, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. त्याचप्रमाणे खरीप हंगामात पाऊस कमी झाल्याने व जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने रबी ज्वारी व इतर पिकांची कमी प्रमाणात पेरणी झाली अूसन, येणाºया काळात चाºयाची कमतरता भासू शकते. या शिवाय या दोन्ही तालुक्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. तेव्हा गंगाखेड व जिंतूर तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याची कार्यवाही करावी, अशी विनंती जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.या मंडळांचा पाठविला अहवाल४गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यातील दहा मंडळांचा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठविल आहे. त्यानुसार गंगाखेड मंडळात ७८.५ टक्के, राणीसावरगाव मंडळात ५०.३६, माखणी ५३़२३, महातपुरी ५९़२५, जिंतूर ६९़६१, सावंगी म्हाळसा ८३़७१, बोरी ५५़४४, चारठाणा ४७़६८, आडगाव ३८़४४ आणि बामणी मंडळात ७९़०९ टक्के पाऊस झाला आहे़ तेव्हा या मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, असा अहवाल पाठविण्यात आला आहे़ या दहा मंडळांपैकी गंगाखेड, सावंगी म्हाळसा आणि बामणी या तीन मंडळांतील पावसाची टक्केवारी ७० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने हे मंडळ वगळता उर्वरित ७ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर होवू शकतो, अशी आशा निर्माण झाली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळFarmerशेतकरी