शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"
2
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
3
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
4
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
5
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
7
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
8
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
9
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
12
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
13
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
14
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
15
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
16
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
17
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
18
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
19
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
20
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा

परभणी : तालुक्यातील गावे नाहीत म्हणून तोडला वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:23 PM

तुमची गावे आमच्या तालुक्यात नाहीत़ त्यामुळे तुमच्या तालुक्यातून वीज जोडणी घ्या, असे म्हणत सोनपेठ येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याने गंगाखेड तालुक्यातील पाच गावांचा वीज पुरवठाच खंडीत केल्याचा धक्कादायक प्रकार ९ आॅक्टोबर रोजी घडला़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): तुमची गावे आमच्या तालुक्यात नाहीत़ त्यामुळे तुमच्या तालुक्यातून वीज जोडणी घ्या, असे म्हणत सोनपेठ येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याने गंगाखेड तालुक्यातील पाच गावांचा वीज पुरवठाच खंडीत केल्याचा धक्कादायक प्रकार ९ आॅक्टोबर रोजी घडला़गंगाखेड तालुक्यातील धनगरमोहा, शेंडगा, उखळी खु़, मानकादेवी व श्रीक्षेत्र हरंगुळ या पाच गावांतील ग्रामस्थांना घरगुती वापरासाठी व कृषीपंपासाठी सोनपेठ तालुक्यातून वीज पुरवठा केला जातो़ वीज वापरापोटी ग्रामस्थ गंगाखेड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात बिल भरत असतात़९ आॅक्टोबर रोजी सकाळी सोनपेठ येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता कांबळे यांनी करम (ता़ सोनपेठ) येथील ३३ केव्ही या उपकेंद्रातून वरील पाच गावांना होणाऱ्या वीज पुरवठ्याची वीज जोडणी तोडली़ मंगळवारी सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरू झाला नसल्याने याबाबत पाच गावांतील ग्रामस्थांनी या भागातील लाईनमनकडे विजेसंबंधी चौकशी केली़ तेव्हा लाईनमन सांगितले की, सोनपेठ येथून तुमचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यावरून ग्रामस्थांनी १० आॅक्टोबर रोजी गंगाखेड येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठून ग्रामीण विभाग- २ चे सहाय्यक अभियंता पराग डोेण यांची भेट घेतली़ खंडीत केलेला वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली़ त्यावरून अभियंता डोणे यांनी सोनपेठ येथील उपकार्यकारी अभियंता कांबळे यांच्याकडे वीज जोडणीची मागणी नोंदविली; परंतु, अभियंत्यांनी वीज पुरवठा पूर्ववत करण्यास नकार दिला़ त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांची भेट घेतली व वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली़ तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर धनगर मोहा येथील सरपंच सारिका खांडेकर, आत्माराम मांगदरे, रमेश खांडेकर, बाळासाहेब गायकवाड, दादासाहेब खांडेकर, रविकुमार घुले, सुनील खांडेकर, अय्युब पठाण, दिगंबर व्होरगीळ, धनंजय फड, मनोहर खांडेकर, राजेभाऊ नरवाडे, धोंडीबा व्होरगीळ, खाजा खान पठाण, भागवत फड, चंद्रहंस तिडके, रघुनाथ हाके, देविदास गायकवाड, ज्ञानोबा व्होरगीळ, आत्माराम तरडे, शेख वहाब, ईश्वर आंधळे आदीं ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत़पाच गावांतील : पाणीपुरवठ्यावर परिणामतालुक्यात गावे नसल्यामुळे खंडीत करण्यात आलेला पाच गावांतील वीज पुरवठा बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू करण्यात आला नव्हता़ त्यामुळे गंगाखेड तालुक्यातील धनगरमोहा, शेंडगा, उखळी खु़, मानका देवी, श्रीक्षेत्र हरंगुळ या गावातील पाणीपुरवठ्यासह दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्याचबरोबर मागील अनेक वर्षांपासून गंगाखेड तालुक्यातील ही पाच गावे सोनपेठ तालुक्यातील करम येथील ३३ केव्ही उपकेंद्राला जोडलेली आहेत़ त्यांना तेथून नियमित वीज पुरवठाही करण्यात येत होता़ परंतु, अचानक उपकार्यकारी अभियंत्यांच्या या कारवाईमुळे पाच गावांतील ग्रामस्थ हैराण झाले आहेत़ कोणतीही पूर्वसूचना न देता सरळ वीजपुरवठा खंडीत करण्याच्या कारवाईमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीPower Shutdownभारनियमनwater scarcityपाणी टंचाई