लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : एकाच ठिकाणी सेवेत ६ व ३ वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत असणाºया महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असून, कर्मचाºयांकडून यासाठीचे दहा पसंती क्रम प्रशासनाकडून घेण्यात येणार आहेत़जिल्ह्यात ३१ मे २०२० रोजी पदावर ३ वर्षे व कार्यालयात ६ वर्षे पूर्ण होणाºया अधिकारी, कर्मचाºयांच्या एप्रिल, मे महिन्यात बदल्या होणार आहेत़ या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने बदली पात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्यात आली़ त्यामध्ये तीन वर्ष पूर्ण करणारे नायब तहसीलदार दर्जाचे १०, अव्वल कारकून दर्जाचे २२, मंडळ अधिकारी ८ व लिपिक ३७ आहेत़ तर सहा वर्षे कालावधी पूर्ण करणारे अव्वल कारकून १०, लिपिक चौदा आहेत़ या कर्मचाºयांना ९ एप्रिलपर्यंत १० पसंती क्रमांकासह प्रशासनाला माहिती सादर करावयाची आहे़ त्यामध्ये दिव्यांग, असक्षम, गंभीर आजारी, विधवा/परितक्त्या, पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत बसत असल्यास त्याचाही तपशील पुराव्यासह सादर करावा लागणार आहे़ पुराव्यासह कागदपत्रे सादर न करणाºयांचा त्या अनुषंगाने विचार केला जाणार नाही, अशीही सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे़तब्बल १० वर्षे एकाच ठिकाणी मांडले ठाण४गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गतही कर्मचाºयांच्या बदल्यांच्या अनुषंगाने प्रक्रिया सुरू झाली आहे़ यामध्ये सहा वर्षांपेक्षा अधिक कालवधी पूर्ण करणारे ३ तलाठी व ३ वर्षापेक्षा अधिक सेवा करणारे १८ तलाठी कार्यरत आहेत़४पूर्णा तालुक्यातील वझूर सज्जाचे तलाठी हरि भीमराव लोंढे हे एकाच ठिकाणी तब्बल १० वर्षे ४ महिने कार्यरत आहेत़४तर गंगाखेड तालुक्यातील खळी सज्जाचे तलाठी चंद्रकांत नारायण साळवे हे ९ वर्षे ११ महिऩे४पूर्णा तालुक्यातील बलसा बु़ सज्जाचे तलाठी रमेश श्रीरंगराव बनसोडे हे ६ वर्षे १० महिने एकाच ठिकाणी कार्यरत आहेत़ या तिन्ही कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहेत़३२ पदे रिक्त४जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत सद्यस्थितीत नायब तहसीलदारांची १२, अव्वल कारकुंनाची ७, मंडळ अधिकाºयांची ६ व लिपिकाची ७ अशी एकूण ३२ पदे रिक्त आहेत़४६ वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाºयांच्या बदलीमुळे अव्वल कारकुंनाची १० व लिपिकांची १४ तर ३ वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाºयांच्या बदल्यामुळे नायब तहसीलदारांची १०, अव्वल कारकुंनाची २२, मंडळ अधिकाºयांची ८ व लिपिकांची ३७ पदे संभाव्य बदलीने रिक्त होणार आहेत़
परभणी: महसूलच्या १०१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 10:57 PM