लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): तालुक्यातील वझर येथील पूर्णा नदीपात्रातील वाळुचा लिलाव झालेला नसतानाही लिलाव झालेल्या दुसऱ्या बाजुच्या पावत्यांचा वापर करून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळुचा उपसा केला जात आहे़ प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष याकडे झाल्याचे दिसून येत आहे़वाळू चोरट्यांनी निवडणुकीचा फायदा घेऊन लाखो रुपयांच्या वाळुचा अवैध उपसा केला़ जिंतूर, परतूर, मंठा या तालुक्यातील वाहने मोठ्या प्रमाणावर दिसून लागली़ पूर्णा नदीपात्राच्या वाळुचा लिलाव झाला नसतानाही ज्या ठिकाणचा लिलाव झाला आहे, त्या ठिकाणच्या पावत्या वापरून वझरमधील काही वाळूचोर पूर्णा नदीतून बेकायदेशीर वाळू उपसा करीत आहेत़महसूल प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची यास छुपी साथ असल्याचे दिसून येत आहे़ विशेष म्हणजे, मोठ्या प्रमाणावर वाळू मिळत असल्याने अचानक एवढी वाळू येते कोठून आली? असा प्रश्नही पडत आहे़ तालुक्यातील डिग्रस, पाचलेगाव, येसेगाव यासह अनेक भागांतून वाळू उपसा होत आहे़प्रशासनाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे़ तालुक्यातील वाळू घाटांचा लिलाव झाला नाही़ मात्र वझर भागातीलच पूर्णा नदीच्या देवठाणा येथील वाळूघाटाचा लिलाव झाला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या पावत्या वापरून नदीतील अन्य ठिकाणावरून वाळू उपसा केला जात आहे. ही बाब महसूल प्रशासनाला माहीत असतानाही कारवाई होत नसल्याने नदीकाठावरील गावांतून आश्चर्य व्यक्त होत आहे़ महसूल प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.वाळूचे भाव घसरलेवझर परिसरातील देवठाणा पॉर्इंट भागातील वाळू ठेका निघाल्याने वाळूचे भाव गडगडले आहेत. २६ हजार रुपयांना ४ ब्रास मिळणारी वाळू आता १६ हजार रुपयांना मिळत आहे़ एका वाळू घाटातून किती वाळू उपसा होतो, याकडे लक्ष देण्यास महसूल प्रशासनाला वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे़ठिक ठिकाणी नेमली माणसेजिंतूर तालुक्यातील वझर व परिसरातील पूर्णा नदीपात्रातून रात्रंदिवस बेसुमार वाळुचा उपसा होत आहे़ या वाळू उपस्यावर कारवाई करण्यासाठी पथक निघाले असता वाळूमाफियांनी ठिक ठिकाणी आपली माणसे बसविली आहेत़ या माणसांद्वारे माहिती मिळताच हे वाळूमाफिया प्रशासनाचे पथक येईपर्यंत गायब होतात़ त्यामुळे प्रशासनाच्या हाती काहीच लागत नाही़ जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे़रात्रीच्या वेळीही नदीपात्रातून वाळू उपसावाळू घाटांचा लिलाव झाल्यानंतर रात्रीच्या वेळी वाळू उपसा करता येत नाही़ परंतु, वझर भागामध्ये रात्री ७ ते सकाळी ६ यावेळेत हजारो ब्रास वाळुचा उपसा होतो़ विशेष म्हणजे जेसीबीच्या सहाय्याने हा वाळू उपसा होत असल्याने महसूल प्रशासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे़ त्यातच वाळू लिलाव झालेली एक पावती फाडून तिचा अनेक ठिकाणी वापर केला जातो़ वाळूमाफिया रात्री-अपरात्री वाळू उपसा करीत आहे़ याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे़
परभणी : वझर येथील चोरटी वाळू वाहतूक थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:45 AM