शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

परभणी :हजारोंच्या जनसागराने दिला गौतमदादांना अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:51 PM

गेल्या ४२ वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविणारे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस अ‍ॅड़ गौतमदादा भालेराव यांना गुरुवारी साश्रू नयनांनी हजारोंच्या जनसमुदायाने अखेरचा निरोप दिला़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : गेल्या ४२ वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविणारे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस अ‍ॅड़ गौतमदादा भालेराव यांना गुरुवारी साश्रू नयनांनी हजारोंच्या जनसमुदायाने अखेरचा निरोप दिला़गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष तथा पेठशिवणी येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सहकारी सूतगिरणीचे चेअरमन अ‍ॅड़ गौतमदादा भालेराव यांचे २७ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले होते़ त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाल्याच्या प्रतिक्रिया विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या होत्या़ रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेले गौतमदादा हजरजबाबी व अभ्यासपूर्ण भाषणासाठी परिचित होते़ त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील हजारो हितचिंतक गंगाखेड येथे दाखल झाले़ दुपारी ३ वाजता आंबेडकर नगर येथील सम्राट निवास येथून सजविलेल्या ट्रकमध्ये अ‍ॅड़ गौतमदादा भालेराव यांची अंत्ययात्रा काढण्यात आली़ दुपारी ४़३० वाजेच्या सुमारास शहरातील दत्तमंदिर परिसरात असलेल्या पी़जी़ भालेराव अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पूर्णा येथील भंते उपगुप्त महाथेरो यांनी बुद्धवंदना घेतल्यानंतर अ‍ॅड़ गौतमदादा यांचे चिरंजीव बुद्धप्रिय भालेराव यांनी त्यांना अग्निडाग दिला़ यावेळी आ़ प्रा़ जोगेंद्र कवाडे, प्रा़ कमलताई गवई, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, सुरेशराव वरपूडकर, खा़ बंडू जाधव, आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे, आ़ डॉ़ राहुल पाटील, माजी खा़ सुरेश जाधव, अ‍ॅड़ गणेश दुधगावकर, माजी आ़ ज्ञानोबा गायकवाड, सुरेश देशमुख, विजय गव्हाणे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे सचिव राजकुमार सागर, साखर आयुक्त बी़ वाय़ गायकवाड, पोलीस अधीक्षक भारत तांगडे, पोलीस अधीक्षक सागर, माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर, नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, लक्ष्मणराव गोळेगावकर, रविकांत चौधरी, संतोष मुरकुटे, विशाल कदम, रामप्रभू मुंडे, दिलीपराव देशमुख, धम्मानंद मुंडे, विजय वाकोडे, बाबूराव पोटभरे, गणपत भिसे, मेघना बोर्डीकर, अशोक उफाडे, विजयकुमार शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी बळीराज लांजिले, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे आदींची उपस्थिती होती़ यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाठविलेला शोक संदेश वाचून दाखविण्यात आला़ यावेळी आंबेडकरी चळवळीतील मराठवाड्याचा सुपुत्र काळाच्या पडद्याआड गेल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या़ फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणारे नेतृत्व व आपल्या शेरोशायरीने सर्वांना मंत्रमुग्ध करणारा आंबेडकरी चळवळीतील ढाण्या वाघ गमावल्याची शोकभावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली़गंगाखेड शहरातील बाजारपेठ बंदअ‍ॅड़ गौतमदादा भालेराव यांच्या निधनानंतर गुरुवारी गंगाखेड शहरातील बाजारपेठ व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली़ दिवसभर शहरातील बाजारपेठ बंद होती़ अ‍ॅड़ गौतमदादा यांच्या पार्थिवावर दुपारी ४़३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर सायंकाळी ५ वाजेनंतर काही व्यापारी प्रतिष्ठाने उघडण्यात आली होती़ अ‍ॅड़ गौतमदादा यांना व्यापाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली़

टॅग्स :parabhaniपरभणी