शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

परभणी : लाच स्वीकारणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:45 AM

वाळू भरताना पकडलेल्या जेसीबी मशीनवर कारवाई न करण्याच्या मागणीसाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकांसह एक शिपाई व एक खाजगी व्यक्ती अशा तिघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): वाळू भरताना पकडलेल्या जेसीबी मशीनवर कारवाई न करण्याच्या मागणीसाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकांसह एक शिपाई व एक खाजगी व्यक्ती अशा तिघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महातपुरी येथे एका वाहनामध्ये वाळू भरताना पोलीस उपनिरीक्षक बाबू गिते, पोलीस शिपाई गौतम भालेराव यांनी जेसीबी मशीन पकडली होती. या वाहनावर कारवाई न करण्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. तसेच खाजगी इसम लक्ष्मण फड (रा.खादगाव) याने मशीन मालक तक्रारदारास सारखे फोन करुन समक्ष पैसे देऊन प्रकरण मिटवून घ्या, असे सांगितले. मात्र जेसीबी मशीन चालकाला लाच द्यायची इच्छा नसल्याने त्याने परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानुसार २० जून रोजी गंगाखेड येथे सापळा लावला.सायंकाळी ६.१८ वाजेच्या सुमारास परळी रोडवरील एका हॉटेलसमोर असलेल्या कारमध्ये उपनिरीक्षक बाबू गिते यांनी तक्रारदाराकडून लाचेची २० हजार रुपयांची रक्कम घेतली व ते निघून गेले व घाईगडबडीत लाचलुचपत विभागाने ठरवून दिलेल्या खुणेप्रमाणे आपण इशारा करु शकलो नाही व त्यानंतर दूरवर कारचा पाठलाग करुनही गिते आढळून आले नाहीत, अशी फिर्याद तक्रारदाराने गंगाखेड ठाण्यात दिली. त्यावरुन उपनिरीक्षक गिते, शिपाई भालेराव व खाजगी व्यक्ती लक्ष्मण फड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग