मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुष्काळी पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी ३ तालुक्यातील शिक्षण घेणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने १५ नोव्हेंबरपासून देण्यात येत असलेल्या मोफत पास योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा जिल्ह्यातील ४ हजार ५८४ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ३३७ विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे.जिल्ह्यामध्ये यावर्षी २० आॅगस्टनंतर पाऊसच पडला नाही. त्यामुळे जिल्ह्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखल्या जाणारा शेती व्यवसाय कोंडीत सापडला आहे. खरीप पाठोपाठ रबी हंगामही शेतकºयांच्या हातून गेला. पिकातून मिळालेल्या उत्पादनावर वर्षभराचे आर्थिक नियोजन करणाºया शेतकºयांच्या हाती एकही पीक लागले नाही. त्यामुळे शेतकºयांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले. त्यामुळे संसाराचा दैनंदिन रहाटगाडा चालवावा की, मुलांचे शिक्षण पूर्ण करावे, या पेचात जिल्ह्यातील पालकवर्ग होता. परभणी जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी शहराच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसमधून ये-जा करतात. विद्यार्थ्यांना बसची पास काढण्यासाठी एकूण तिकिटापैकी ३३.३३ टक्के पैसे मोजावे लागतात. हे पैसे विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नव्हते. त्यामुळे शिक्षण कसे घ्यावे, या विवंचनेत दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विद्यार्थी होते.विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचा निर्णय महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाने परभणी जिल्ह्यातील परभणी, मानवत, पालम, पाथरी, सेलू व सोनपेठ या सहा तालुक्यांचा दुष्काळी एक व दोन यादीमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे या भागातील सर्वसाधारण व व्यवसायिक शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना मासिक पास मोफत देण्याचे आदेश ५ नोव्हेंबर रोजी परिवहन विभागाने काढले आहेत. त्यानुसार मानवत, पालम, परभणी, पाथरी, सेलू व सोनपेठ या सहा तालुक्यातील ३ हजार २४७ विद्यार्थ्यांना या मोफत पासचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे महिन्याकाठी लागणारा विद्यार्थ्यांचा ५ लाख ४७ हजार ९४० रुपयांचा खर्च वाचणार आहे. विशेष म्हणजे या योजनेतून तीन तालुक्यातील १३३७ विद्यार्थ्यांना वगळले आहे. त्यामुळे राज्य शासन व एसटी महामंडळाच्या निर्णयावर विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.१ हजार ३३७ विद्यार्थ्यांवर अन्यायराज्य शासनाने दुष्काळ जाहीर करताना पहिल्या यादीमध्ये मानवत, पालम, पाथरी, सेलू, सोनपेठ व परभणी या सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर केले; परंतु, जिंतूर, गंगाखेड व पूर्णा या तीन तालुक्यांना वगळले होते. दुसºया यादीमध्ये या तालुक्यातील काही मंडळांचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश झाला असला तरी महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ९ तालुक्यांपैकी केवळ सहा तालुक्यांतील ३ हजार २४७ विद्यार्थ्यांनाच एसटी महामंडळाच्या मोफत पासचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित ३ तालुक्यांतील दुष्काळग्रस्त मंडळांना यादीतून वगळले आहे.४त्यामुळे पूर्णा, जिंंतूर व गंगाखेड या तीन तालुक्यांतील १३३७ विद्यार्थ्यांना मोफत पासपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.नवीन पास मिळणार नाहीएसटी महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या शैक्षणिक सत्राच्या १५ नोव्हेंबर २०१८ ते १५ एप्रिल २०१९ पर्यंत मोफत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे नूतनीकरण करणाºया विद्यार्थ्यांनाच हे पास मिळणार आहेत. नव्याने घेण्यात येणाºया विद्यार्थ्यांना हे पास मिळणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
परभणी: मोफत पास योजनेतून तीन तालुके वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:45 AM