लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातून अवैध वाळू, मुरूम, दगड उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे व शासनाचा महसूल बुडून गौन खनिजाची लूट केली जात असल्याचे ३० नोव्हेंबर रोजी तहसीलदार यांच्या पथकाने केलेल्या कार्यवाहीतून समोर आले आहे़तालुक्यातून वाहणाºया गोदावरी नदीपात्रातून रात्रंदिवस होत असलेल्या वाळुच्या अवैध उत्खननाबरोबरच मुरूम, दगड आणि गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे़ गौण खनिजाची लूट करणारी टोळी बिनधास्तपणे मुरूम व दगड खोदून त्याची वाहूतक करीत असल्याचे ३० नोव्हेंबर रोजी साडेचार वाजेच्या सुमारास तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या पथकाने केलेल्या कार्यवाहीतून समोर आली आहे़ तालुक्यातील पिंप्री शिवारातील गायरान जमिनीतून जेसीबी मशीनद्वारे मुरूमाचे उत्खनन करून ट्रॅक्टर क्रमांक एमएच २२ एई-२१९९ व एमएच ३७ एल-९५०२ यामधून मुरूम वाहतूक होत असल्याचे दिसताच तहसीलदार स्वरुप कंकाळ, तलाठी शिवाजी मुरकुटे, गणेश सोडगीर, भालेराव आदींच्या पथकाने जेसीबी मशीन व दोन ट्रॅक्टर पकडून पोलीस ठाण्यात जमा केले आहेत़ यामुळे अवैध गौण खनिजांची लूट करणाºयांचे धाबे दणाणले आहेत़ दरम्यान, गंगाखेड तालुक्यात महसूलचे पथक कारवाई करीत असले तरी अवैध उपसा थांबलेला नाही.कार्यवाही होऊनही : उत्खनन थांबेना४गंगाखेड शहर परिसरातील गोदावरी नदीपात्रातील वाळुच्या धक्क्याचा लिलाव न करताच सर्रासपणे वाळूमाफीया रात्रीच्या वेळी वाळूचा अवैध उपसा करून २० ते २२ हजार रुपयांना तीन ब्रास या प्रमाणे वाळुची विक्री करीत आहेत़ या वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी कडक पावले उचलत गंगाखेड शहर परिसरातील गोदावरी नदीपात्रात २९ नोव्हेंबर रोजी रात्री अवैध वाळू उपसा करणाºया वाहनांना पकडून त्यांच्यावर कार्यवाही केली़ त्याचबरोबर तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या पथकानेही ३० नोव्हेंबर रोजी अवैध मुरूम उत्खनन करणारे तीन वाहने पकडून पोलीस ठाण्यात जमा केली़ अवैध वाळू, मुरूम, दगड उत्खनन करणाºया माफियांवर जिल्हाधिकारी, तहसीलदार व महसूलचे कर्मचारी एक दिवसाआड कार्यवाही करीत आहेत़ या प्रकरणात त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला़ परंतु, माफींयाकडून तालुक्यात अवैधरित्या गौण खनिजाची लूट सुरूच आहे़कार्यवाहीमध्ये सातत्य राखणे गरजेचे४तालुक्यामध्ये गोदावरी नदीपात्राचा भाग सर्वात जास्त आहे़ या नदीपात्रातील वाळुला जिल्ह्यासह पर जिल्ह्यात मोठी मागणी आहे़ घराच्या बांधकामावरील स्लॅबसाठी जिल्ह्यात बहुतांश बांधकामधारक गोदावरी नदीच्या वाळुचा वापर करतात.४त्यामुळे या ठिकाणच्या वाळुला मोठी मागणी आहे़ परंतु, वाळू धक्क्याचे लिलाव न होताच अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे़ कार्यवाही करूनही उपयोग झाला नसल्याने महसूल विभागाच्या वतीने होणाºया कार्यवाहीमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे़ सातत्य ठेवले तरच अवैध वाळू उपसा व गौण खनिज उत्खनन थांबविण्यास मदत होणार आहे़
परभणी : अवैध मुरूम उत्खनन करणारे तीन वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 12:54 AM