लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आशा स्वयंसेविकांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे़ या स्वयंसेविकांच्या माध्यमातून आरोग्याच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यास मदत होते, असे प्रतिपादन आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी केले़येथील जि़प़ कन्या प्रशालेच्या सभागृहात २ फेब्रुवारी रोजी आशा स्वयंसेविकांचा मेळावा पार पडला़ या प्रसंगी आ़ पाटील बोलत होते़ कार्यक्रमास शिवाजीराव बेले, आरोग्य सभापती सचिन देशमुख, जि़प़ सदस्य अंजलीताई देशमुख, शोभाताई घाटगे, गोविंदराव देशमुख, गंगाप्रसाद आणेराव, जनार्धन सोनवणे, प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी उपस्थित मान्यवरांनी आशा स्वयंसेविकांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या मोबदल्यात वाढ होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांंगितले़ दुसऱ्या सत्रात आ़ डॉ़ राहुल पाटील, जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला़ अश्विनी मोरे यांनी प्रास्ताविक केले़ डॉ़ शंकरराव देशमुख यांनी आशा योजनेचे स्वरुप विषद केले़ मधुकर पुर्णेकर यांनी सूत्रसंचालन केले़ यशस्वीतेसाठी रमेश गेठे, उदावंत, रमेश कायंदे, श्याम गायकवाड आदींनी प्रयत्न केले़
परभणी : आशा स्वयंसेविकांच्या माध्यमांतून योजना तळागाळापर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 12:39 AM