लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): येथील गोदावरी नदीवर बांधलेल्या मुळी बंधाºयास अद्यापपर्यंत दरवाजे बसविले नसल्याने यावर्षीच्या पावसाळ्यातही बंधाºयातील पाणी वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघावा, या उद्देशाने पाटबंधारे विभागाने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून २०११ मध्ये मुळी शिवारात निम्न पातळी बंधाºयाची निर्मिती केली. या बंधाºयाला बसविलेले स्वयंचलित दरवाजे २०१२ व २०१६ साली पुराच्या पाण्यात निखळून पडले. त्यामुळे बंधाºयाच्या उभारणीपासून ते आजपर्यंत हा बंधारा कोरडाठाक आहे. कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही बंधाºयात पाणीसाठा होत नसल्याने हा बंधारा शोभेची वास्तू ठरत आहे. परिणामी या भागातील शेतकºयांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होऊन दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान शेतकºयांना सहन करावे लागत आहे.बंधाºयात बसविलेले स्वयंचलित दरवाजे काढून त्या जागी उचल पद्धतीचे दरवाजे बसवून पाण्याची साठवणूक करावी, अशी मागणी येथील शेतकरी, लोकप्रतिनिधी वारंवार करीत आहेत. मात्र दरवाजांच्या कामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने बंधारा कोरडाठाक राहत आहे. गोदावरी नदीपात्रात मुळी बंधारा असूनही परिसरातील नागरिकांना दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावत आहे. पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी जेरीस आले आहेत. बंधाºयाच्या दरवाजांचा प्रश्न पावसाळ्यापूर्वीच निकाली काढावा. तसेच बंधाºयाच्या आतील बाजूने पडलेले साहित्य काढूून घेत पात्राचे खोलीकरण करावे, अशी मागणी होत आहे.तर होऊ शकतो पाण्याचा फायदा४गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात ११.३७ दलघमी क्षमतेचा मुळी बंधारा उभारला आहे. बंधाºयाच्या आतील बाजूने पडलेले साहित्य काढून गोदावरी नदीपात्राचे खोलीकरण केल्यास बंधाºयाच्या ओट्याच्या बरोबरीने सांडव्याच्या आतून पाणी साचून राहील. या पाण्याच्या माध्यमातून गोदाकाठच्या गावांचा पाणीप्रश्न निकाली निघेल. तसेच परिसरातील भूजल पाणीपातळी वाढून दुष्काळापासून दिलासा मिळू शकतो. तेव्हा पाटबंधारे विभागाने नदीपात्राचे खोलीकरण करावे, अशी मागणी होत आहे.गतवर्षीही बंधारा राहिला कोरडठाक४मागील पाच ते सहा वर्षांपासून मुळी बंधाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाटबंधारे विभागाने या बंधाºयाला वेळीच गेट बसविले असते तर दुष्काळाची दाहकता कमी झाली असती; परंतु, पाटंधारे विभागाच्या उदासिन भूमिकेमुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.४मागील वर्षी जिल्ह्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पाबरोबरच मुळी बंधाºयातही पाणीसाठा उपलब्ध नसल्याने तालुकावासियांना टंचाईचा सामना करावा लागला.४यावर्षी तरी प्रशासनाने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी गंगाखेड तालुक्यातील नागरिकांच्या वतीने होत आहे.प्रशासनाकडून केवळ नाचविले जात आहेत कागदी घोडे४मागील सहा वर्षापासून मुळी बंधाºयाच्या दरवाजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुष्काळात मुळी बंधारा लाभक्षेत्रातील शेतकºयांसह ग्रामस्थ होरपळत असताना या बंधाºयाच्या दरवाजाचा प्रश्न जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडून प्राधान्याने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करणे आवश्यक होते.४दरवाजाच्या प्रश्नासाठी केवळ कागदोपत्री घोडे नाचवून पाठपुरावा करीत असल्याचे दाखविले जात आहे. विशेष म्हणजे, कोट्यावधी रुपये खर्च करून शेतकºयांना लाभ होईल, या हेतूने बांधण्यात आलेल्या बंधाºयाच्या मुख्य धोरणास हरताळ फासला जात आहे.४विशेष म्हणजे जिल्हा प्रशासन पाठपुरावा करीत असताना लोकप्रतिनिधीकडून मात्र आवश्यक तेवढा पाठपुरावा केला जात नसल्यानेही संताप व्यक्त केला जात आहे.
परभणी : यंदाही बंधाऱ्यातील पाण्याला मोकळी वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:42 PM