लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड/सोनपेठ (परभणी) : सोनपेठ व गंगाखेड तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची तूर, शासकीय हमीभाव दरात खरेदी करण्यासाठी गंगाखेड शहरातील एमआयडीसी परिसरात हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते; परंतु, एक महिन्याचा कालावधी उलटत असताना केवळ २६९ शेतकऱ्यांची ८३० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे हमीभाव केंद्रावर तूर खरेदीची गती संथ असल्याने तूर उत्पादकांत संताप व्यक्त होत आहे.गंगाखेड व सोनपेठ तालुक्यातील १ हजार ६७५ तूर उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय हमीभावात तूर विक्री करण्यासाठी तालुका खरेदी विक्री संघाकडे आॅनलाईन नोंदणी केलेली आहे. शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर १ ते २८ मार्च या कालावधीत तालुका खरेदी विक्री संघाकडून आॅनलाईन नोंदणी करणाºया १ हजार ६७५ पैकी ४५० तूर उत्पादक शेतकºयांना तूर विक्रीसाठी आणण्याचे संदेश पाठविण्यात आले. यामध्ये शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावरील संदेश मिळण्यापूर्वीच दुष्काळी परिस्थितीत अडकलेल्या काही शेतकºयांनी आपल्या जवळील तूर खाजगी व्यापाºयांना विक्री केली. त्यामुळे संदेश पाठविलेल्या ४५० तूर उत्पादकांपैकी २६९ शेतकºयांनी आपल्या जवळील ८३० क्विंटल तूर या हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री केली. शासकीय हमीभाव तूर खरेदी केंद्र शासकीय गोडाऊन ऐवजी भाडेतत्त्वावर घेतलेल्या खाजगी गोडाऊनमध्ये सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे अपुरी जागा असल्याने केवळ एका वजन काट्यावर होणारी तूर खरेदी संथ गतीने सुरू असल्याचे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकºयांना त्रास होत आहे. त्यामुळे खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक बाबासाहेब भोसले, भागवत सोळंके, लक्ष्मण मुरकुटे यांनी तातडीने केंद्रावरील वजन काटे वाढवून तूर खरेदी करावी, अशी मागणी केली आहे.हरभरा खरेदीची नोंदणी सुरू४तालुक्यातील शेतकºयांजवळील हरभरा शासकीय हमीभाव दरात खरेदी करण्यासाठी तालुका खरेदी विक्री संघात २५ मार्चपासून आॅफलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यात ५० शेतकºयांनी नोंदणी केली असून त्यांची आॅनलाईन नोंदणी करणे सुरू आहे. तालुक्यातील शेतकºयांनी हरभरा विक्रीसाठी तालुका खरेदी विक्री संघात नोंदणी करावी, असे आवाहन व्यवस्थापक बाबासाहेब भोसले यांनी केले आहे.
परभणी:हमीभाव खरेदी केंद्रावर तूर खरेदी संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 10:53 PM