लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील कारेगाव रोडवरील जायकवाडी वसाहतीसमोरील एक झाड कोसळून रस्त्यावर पडल्याची घटना १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत एक महिला बालंबाल बचावली.देशमुख हॉटेल परिसरातून सुपर मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर जायकवाडी वसाहत आहे. या वसाहतीच्या संरक्षण भिंतीलगत असलेले एक झाड शुक्रवारी सकाळी अचानक मुळापासून उन्मळून रस्त्यावर पडले. याच वेळी स्कुटीने एक महिला या रस्त्याने जात होती. झाड खाली पडत असल्याचे लक्षात येताच या महिलेने स्कुटी जागीच सोडून स्वत:चा बचाव केला. यामुळे ही महिला बचावली. गुरुवारी परभणी शहर व परिसरात दिवसभर भीज पाऊस झाला. या पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने हे झाड कोसळले असावे. दरम्यान, मोठे झाड रस्त्यावर आडवे झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.तसेच या भागातून जाणाºया विजेच्या ताराही तुटल्या. नगरसेवक चंद्रकांत शिंदे, प्रशास ठाकूर, रितेश जैन यांनी घटनास्थळी दाखल होऊन ही माहिती मनपा प्रशासनाला दिली. त्यानंतर काही वेळातच मनपाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
परभणी :जायकवाडी समोरील रस्त्यावर पडले झाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:31 AM