शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

परभणी : आश्रमशाळांमधील बायोमॅट्रिक मशीन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:30 AM

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी बसविण्यात आलेल्या बायोमॅट्रिक मशीन बंद असल्याचे आढावा बैठकीत उघडकीस आले आहे. त्यामुळे अशा आश्रमशाळांची मान्यता रद्द करण्याची कारवाई सुरु करावी, असे आदेश या विभागाचे सचिव जे.पी.गुप्ता यांनी सर्व सहाय्यक समाजकल्याण आयुक्तांना दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थी, शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी बसविण्यात आलेल्या बायोमॅट्रिक मशीन बंद असल्याचे आढावा बैठकीत उघडकीस आले आहे. त्यामुळे अशा आश्रमशाळांची मान्यता रद्द करण्याची कारवाई सुरु करावी, असे आदेश या विभागाचे सचिव जे.पी.गुप्ता यांनी सर्व सहाय्यक समाजकल्याण आयुक्तांना दिले आहेत.राज्य शासनाने राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये आधारकार्ड, बायोमॅट्रिक हजेरी विद्यार्थी व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाºयांसाठी अनिवार्य केली आहे. यासाठी संबंधित आश्रमशाळांना बायोमॅट्रिक मशीनही उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या; परंतु, बहुतांश आश्रमशाळांमधील बायोमॅट्रिक मशीन बंद असल्याची बाब प्रादेशिक विभागाच्या दर महिन्याच्या आढावा बैठकीत उघडकीस आली. या अनुषंगाने विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभागाचे सचिव जे.पी.गुप्ता यांनी सर्व सहाय्यक समाजकल्याण आयुक्तांना या संदर्भात कडक भूमिका घेण्याचे आदेश पत्रान्वये दिले आहेत. ज्या आश्रमशाळांमध्ये बायोमॅट्रिक मशीन बंद आढळून आल्या आहेत व त्या संस्थांना शासनाद्वारे वेतनोत्तर अनुदान दिले जाते, त्या संस्थांनी तातडीने बायोमॅट्रिक मशीन खरेदी कराव्यात किंवा दुरुस्त करुन घ्याव्यात. बायोमॅट्रिक हजेरी प्रणालीशिवाय कोणत्याही प्रकारची हजेरी चालणार नाही. ही प्रणालीच बंधनकारक राहील. जे बायोमॅट्रिक प्रणालीवर हजेरी नोंदविणार नाहीत, त्यांचे वेतन व वेतनेत्तर अनुदान शासन निर्णयाप्रमाणे बंद करण्याची कारवाई करुन त्यांच्या मान्यता रद्दची कार्यवाही सुरु करावी, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.इतर शाळांच्या तुलनेत आश्रमशाळांची संकल्पना/ उद्देश हा पूर्णत: वेगळा असल्याने आश्रमशाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी आश्रमशाळेतील १ कि.मी. परिसरात वास्तव्य करणे आवश्यक आहे; परंतु, आश्रमाशाळांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी १ कि.मी. परिसरात किंवा आश्रमशाळेच्या ठिकाणी वास्तव्यास राहत नाहीत.त्यामुळे त्यांचा घरभाडेभत्ता बंद करणे आवश्यक असल्याचे महालेखापालांनी लेखापरिक्षणात नोंदविले आहे. त्यानुसार त्यांना दिलेला घरभाडेभत्ता वसूल करावा, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे. आश्रमशाळांमध्ये वसतिगृह अधीक्षक यांना वसतिगृह परिसरात निवासस्थान उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित संस्थाचालकांची आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही करावी, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.आश्रमशाळा तपासणीचे आदेश४सहाय्यक समाजकल्याण आयुक्तांनी त्यांच्या अख्त्यारित येणाºया आश्रमशाळांची नियमित तपासणी करावी. या संदर्भात फक्त व्हिजीट बुकमध्येच नोंद न करता तपासणीच्या विहित नमुन्यात प्रपत्र भरुन त्या तपासणी प्रपत्राच्या ८ प्रती कराव्यात व त्या ठरवून दिलेल्या यंत्रणांना पाठवून द्याव्यात. तपासणीत आढळलेल्या मुद्यांचे स्पष्टीकरण १५ दिवसांत दिले नाही तर आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करावी, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. आश्रमशाळांमधील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाºयांवरील कार्यवाही सहाय्यक समाजकल्याण आयुक्तांची लेखी मान्यता घेऊनच करावी, असेही या संदर्भातील आदेशात नमुद करण्यात आले आहे.४परभणी जिल्ह्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग विभागातील विद्यार्थ्यांसाठी ३९ आश्रमशाळा कार्यरत आहेत. या आश्रमशाळांमध्ये निवासी ४ हजार तर अनिवासी ४ हजार असे ८ हजार विद्यार्थी शिक्षक घेतात. जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कर्मचाºयांच्या उपस्थितीसाठी आधार बेसड् बायोमॅट्रिक प्रणाली बसविण्यात आली असल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थीTeacherशिक्षक