लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ७७३ खातेदार शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत २ लाख ६६ हजार २२६ शेतकºयांचे अर्ज अपलोड झाल्याने या शेतकºयांना आता या योजनेअंतर्गत दरवर्षी ६ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे.केंद्र शासनाने फेब्रुवारी महिन्यात देशात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना लागू केली होती. त्यानुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने ही योजना राज्यात १०० टक्के लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे १ फेब्रुवारी २०१९ पर्यतचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकूण धारणक्षेत्र २ हेक्टरपर्यंत असेल अशा पात्र कुटुंबियास २ हजार रुपयांचा एक हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यात वर्षभरात ६ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १ फेब्रुवारी २०१९ पर्यंत संबंधित खातेदार शेतकरी कुटुंबियाच्या नावे असलेली जमीनधारणा लक्षात घेऊन १ डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे.या योजनेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार आतापर्यत परभणी तालुक्यातील ७९ हजार ३९१ पैकी ४१ हजार ५६२, सेलू तालुक्यातील ५१ हजार ५६७ पैकी ३० हजार ४२५, जिंतूर तालुक्यातील ७३ हजार ३६७ पैकी ४६ हजार ६५, पाथरी तालुक्यातील ३९ हजार ८७३ पैकी २२ हजार ९९३, मानवत तालुक्यातील ३५ हजार ७२७ पैकी २२ हजार ६५८, सोनपेठ तालुक्यातील ३० हजार ९६९ पैकी १८ हजार ५५, गंगाखेड तालुक्यातील ५६ हजार ४१ पैकी ३१ हजार ३९४, पालम तालुक्यातील ४२ हजार ७०१ पैकी २४ हजार २४५ आणि पूर्णा तालुक्यातील ५५ हजार १५१ पैकी २८ हजार ८२९ अशा जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ७८३ पैकी २ लाख ६६ हजार २२६ शेतकºयांनी लाभासाठीचे अर्ज अपलोड केले आहेत. या अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुका व ग्रामस्थरावर समित्यांचे गठण करण्यात आले आहे. या माध्यमातून नियमितपणे या योजनेचा आढावा प्रशासकीय पातळीवरुन घेतला जात आहे. अद्यापही जिल्ह्यातील तब्बल १ लाख ९८ हजार ५५७ शेतकºयांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. या शेतकºयांनी अर्ज केल्यानंतर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.८५ टक्के कुटुंबिय अपेक्षितच्प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील किमान ८५ टक्के कुटुंबियांना लाभ मिळावा, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ७८३ पैकी किमान ३ लाख ९५ हजार ६१ लाभार्थ्यांना लाभ मिळावा, असे प्रशासनाला वाटते. त्या दृष्टीकोणातून प्रशासकीय पातळीवर नियोजन केले जात आहे.च्या योजनेचा लाभ जमीनधारणा करणारी संस्था, संवैधानिक पद धारण करणारे आजी, माजी व्यक्ती, आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री, जि. प. अध्यक्ष, महापौर, केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी, कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारितील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांधील नियमित अधिकारी, कर्मचारी, मागच्या वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ आदींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तशी अट प्रशासनाने लागू केली आहे.
परभणी : अडीच लाख शेतकऱ्यांचे अर्ज झाले अपलोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:12 AM