लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : शेत आखाड्यांवरील पाळीव जनावरांवर हिंस्त्र पशूच्या हल्ल्याची मालिका सलग तिसºया दिवशीही सुरू असून, ५ मार्च रोजी रात्री देवठाणा येथे एका गायीच्या वासरावर हिंस्त्र पशूने हल्ला केल्याने भीती वाढत चालली आहे़ दरम्यान, हा हिंस्त्र पशू बिबट्याच असल्याचा संशय दाट होत चालला आहे़ यास वन विभागानेही तिसºया दिवशी पुष्टी दिल्यामुळे भीतीत आणखी वाढ झाली आहे़पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर येथे १ मार्च रोजी शेळीच्या दोन पिलांवर हल्ला झाला होता़ त्यानंतर देऊळगाव दुधाटे येथेही अशीच घटना घडली़ सोमवारी रात्री देवठाणा येथील पिराजी व्यंकटी जोगदंड यांच्या शेतातील गायीच्या वासरावर प्राणघातक हल्ला झाला़ विशेष म्हणजे वासराच्या शरिराचा अर्धा भाग या हिंस्त्र पशूने खाऊन टाकला़आठवडाभरात सलग तीन घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ या तिन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या पथकाने पंचनामेही केले आहेत़ देऊळगाव येथे हिंस्त्र पशूच्या पायांचे ठसे आणि केसांचा पंचनामा केल्यानंतर हा हिंस्त्र पशू बिबट्या नसून तरस असल्याचा निर्वाळा वनविभागाने दिला होता़६ मार्च रोजी वनपाल चंद्रा मोघे व पथकाने देवठाणा येथे भेट दिली़ या भेटीनंतर अधिकाºयांनी स्पष्टीकरण दिले नसले तरी त्या ठिकाणाचे पुरावे जमा करून हिंस्त्र पशूबाबत अंदाज वर्तविला जाऊ शकतो, असे सांगितले़ सोमवारी रात्री देवठाणा येथे आखाड्यावरील कुत्र्यांची आणि हिंस्त्र पशूची झुंज झाली होती़ महिनाभरापूर्वी देखील आखाड्यावरील पाळीव प्राण्यांवर असाच हल्ला झाला होता़ त्यावेळी वन विभागाने त्या प्राण्यास पकडण्यासाठी पिंजरा बसविला़ परंतु, तो प्राणी सापडला नाही़ देवठाणा येथे पुन्हा एकदा हिंस्त्र पशूचा हल्ला झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ दरम्यान, हा हिंस्त्र पशू बिबट्या नसून तरस व इतर प्राणी असल्याचे वन विभागाकडून वारंवार सांगण्यात येत असले तरी झालेले हल्ले लक्षात घेता आणि ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ला करणारा बिबट्याच असल्याचे ठोसपणे सांगितले जात आहे़दरम्यान, गायीच्या वासरावर हल्ला करणारा हिंस्त्र पशू हा बिबट्या असू शकतो, असा संशय वन परीक्षेत्र अधिकारी डीक़े़ डाखोरे यांनी व्यक्त केला आहे़
परभणी : हिंस्त्र पशूचा दोन जनावरांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 11:36 PM