शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

परभणी : गोदावरीवर ३४ कोटी खर्चून होणार दोन पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:39 AM

जिल्ह्यातील पूर्णा व पालम तालुक्यातील धानोरा काळे आणि वझूर-रावराजूर रस्त्यावरील गोदावरी नदीवर पूल उभारण्यासाठी ३४ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या संदर्भातील कामाच्या निविदाही सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्या आहेत़ त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या पुलांच्या मागणीचा प्रश्न निकाली निघणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील पूर्णा व पालम तालुक्यातील धानोरा काळे आणि वझूर-रावराजूर रस्त्यावरील गोदावरीनदीवर पूल उभारण्यासाठी ३४ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या संदर्भातील कामाच्या निविदाही सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्या आहेत़ त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या पुलांच्या मागणीचा प्रश्न निकाली निघणार आहे़परभणी ते पालम या ताडकळसकमार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे या गावाजवळ गोदावरीनदीवर कमी उंचीचा पूल अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे़ गोदावरी नदीला पूर आल्यानंतर हा रस्ता अनेक वेळा बंद झालेला आहे़ त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होत होती़ शिवाय हा जुना पूल असल्याने येथे नव्याने पूल उभारण्याची मागणी या परिसरातील ग्रामस्थांची होती़ याशिवाय पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयाची पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे़ त्यामुळे या बंधाºयात अधिक पाणीसाठा झाल्यास जुना पुल पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे़ त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता होती़ त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर चर्चाही झाली; परंतु, पुलाची उंची वाढविण्याऐवजी थेट नव्यानेच पूल उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला़ त्यानुसार आता या पुलाच्या २० मीटर बाजुला नव्याने पूल उभारण्यात येणार आहे़ जुन्या पुलापेक्षा साडेचार मीटर अधिक उंचीचा हा पूल राहणार आहे़ यासाठी १९ कोटी १४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे़ हा निधीही राज्यस्तरावर उपलब्ध झाला आहे़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या कामाच्या निविदा काढल्या आहेत़ १० डिसेंबरपर्यंत या कामासाठी इच्छुक कंत्राटदारांना निविदा सादर करता येणार आहेत़त्यानंतर निविदा मंजुरी व प्रत्यक्ष कामाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे़साधारणत: जानेवारी अखेरपर्यंत ही सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होईल़ त्यानंतर कंत्राटदार निश्चित होवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे या रस्त्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे़वझूरजवळील पुलामुळे लातूरचे अंतर घटणारपूर्णा तालुक्यातील पिंगळी-ताडलिमला-वझूर-रावराजूर-मरडसगाव या राज्य महामार्ग ३५ क्रमांकावर वझूर गावाजवळील गोदावरी नदीवर पूल उभारण्यात येणार आहे़ या पुलाच्या कामाचे भूमीपूजन २४ जून रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले होते़ आता या रस्ता कामासाठी १५ कोटी ९ लाख ५२ हजार २८१ रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे़ त्यामुळे या कामाच्याही निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने १९ नोव्हेंबर रोजी काढल्या आहेत़ त्यानुसार इच्छुक कंत्राटदारांना १५ डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत़ त्यानंतर २१ डिसेंबर रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत़ याच दिवशी या कामाचा कंत्राटदार निश्चित होणार आहे़ त्यामुळे या प्रलंबित बहुप्रतीक्षित रस्त्यावरील पुलाचा प्रश्नही मार्गी लागला आहे़ या रस्त्यावरील गोदावरी नदीवर पूल झाल्यास नांदेड-हिंगोली-नागपूरहून येणाºया वाहनांना त्रिधारा पाटी-पिंगळी-लिमला-वझूरमार्गे लातूरला जाता येणार आहे़ यामुळे जवळपास ५० ते ६० किमी लातूरचे अंतर कमी होणार आहे़ शिवाय बांधकाम विभागाच्या अंदाजानुसार या पुलाचा ८ ते ९ तालुक्यांना लाभ होणार आहे़ तसेच या भागात दळणवळणाची साधनेही वाढणार आहेत़पुलांची वेगाने कामे होण्याची गरज४जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील दोन्ही मोठ्या पुलांच्या कामासाठी जवळपास ३४ कोटी २३ लाख रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे़ या कामाच्या निविदाही निघाल्या आहेत़ त्यामुळे प्रत्यक्ष कामाला निविदा प्रक्रियेनंतर तातडीने सुरुवात होणे आवश्यक आहे़४एप्रिल महिन्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे़ त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते़ त्यामुळे तत्पूर्वीच ही सर्व प्रक्रिया पूर्ण होवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे आवश्यक आहे़ यासाठी प्रशासकीय पातळीवरून सूत्रे हलणे गरजेचे आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीgodavariगोदावरी