शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

परभणी : दोन बसेस घसरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:21 AM

जिंतूर- परभणी हा महामार्ग ठिकठिकाणी खोदण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पाणी झाले. चिखलमय झालेल्या रस्त्यावरुन दोन बसेस घसरल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर- परभणी हा महामार्ग ठिकठिकाणी खोदण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पाणी झाले. चिखलमय झालेल्या रस्त्यावरुन दोन बसेस घसरल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.परभणी शहरातून जाणारे परभणी- गंगाखेड, परभणी- जिंतूर, परभणी- पाथरी व परभणी-वसमत हे चारही महामार्ग पुनर्बांधणीसाठी मागील सहा महिन्यांपासून खोदण्यात आले आहेत. हे महामार्ग खोदल्यानंतर या रस्त्यावरुन धावणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या बाजूला पक्का रस्ता तयार करुन देणे अपेक्षित होते; परंतु, संबंधित विभागाचे दुर्लक्ष व कंत्राटदारांनी दाखवलेल्या उदासीन भूमिकेमुळे कच्च्या रस्त्यावरुनच वाहनधारकांना या चारही महामार्गावरुन वाहने चालवावी लागत आहेत.परभणी जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जिंतूर- परभणी या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. या चिखलमय रस्त्यावरुन धावणाºया वाहनांमध्ये दररोजच अपघाताच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी सायंकाळी परभणी तालुक्यात पाऊस झाला. या पावसामुळे हा महामार्ग चिखलमय झाला. परिणामी, परभणी तालुक्यातील झरी गावानजीक जिंतूरकडून येणाºया औरंगाबाद- निजामाबाद व जिंतूरकडे जाणाºया वसमत -औरंगाबाद या दोन गाड्या एकमेकांना साईड देताना रस्त्याच्या खाली घसरल्या. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली. त्यामुळे प्रत्येक जण बसखाली उतरण्यासाठी धडपड करु लागले. त्यातच काही प्रवाशांनी प्रसंगावधान दाखूवन बसला असलेल्या आपतकालीन खिडकी उघडून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरूस्त करावा अशी मागणी होत आहे.निसरडी वाट : अपघाताच्या घटना झाल्या नित्याच्याच४परभणी- जिंतूर हा महामार्ग पुनर्बांधणीसाठी ठिकठिकाणी खोदण्यात आला. मात्र वाहनांना ये-जा करण्यासाठी कोणताही पक्का रस्ता तयार करुन देण्यात आला नाही. थोडासा पाऊस झाला तर परभणी तालुक्यातील धर्मापुरी, झरी, टाकळी कुंभकर्ण तर जिंतूर तालुक्यातील बोरी या गावानजीक वाहने रस्त्यावरुन घसरण्याच्या घटना दररोज घडत आहेत.४त्यामुळे तासन्तास वाहतुकीची कोंडी होत आहे. छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. जिंतूरकरांनी या रस्त्यासाठी पावसाळ्याचा धोका ओळखून वेगवेगळ्या पद्धतीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला; परंतु, ‘शासकीय काम महिनाभर थांब’ या म्हणी प्रमाणेच जिंतूरकरांच्या मागणीलाही शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूकRainपाऊस