लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात सोमवारी २० नवीन कोरोना संशयित रुग्ण जिल्हा आरोग्य संस्थेत दाखल झाले असून, या सर्वांचे स्वॅब नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभागासह महसूल, पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. थोडाही संशय आल्यास संबंधितास संशयित म्हणून तपासणी केली जात आहे. सोमवारी जिल्ह्यात नवीन २० संशयित रुग्णांची नोंद आरोग्य विभागाने घेतली असून, त्यांचे स्वॅब नमुने औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. एकाच दिवशी २० संशयित दाखल झाल्याने चिंता निर्माण झाली आहे.दरम्यान जिल्हा आरोग्य विभागाने आतापर्यंत ३४० संशयित रुग्णांची नोंद घेतली असून, त्यापैकी १४२ जणांचे विलगीकरण केले आहे. १७० जणांचा विलगीकरणाचा कालावधी संपला असून, त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सद्यस्थितीला २८ जण संस्थांत्मक विलगीकरण कक्षात दाखल असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. आजपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही हे विशेष़जिल्हा प्रशासनाने आत्तापर्यंत स्वॅब नमुने घेतले असून त्यापैकी २५८ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ २९ अहवाल प्रलंबीत आहेत, तर १७ अहवाल प्रयोगशाळेने रिजेक्ट केले आहेत़ जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये या साठी जिल्हा आरोग्य विभागाने कडक उपाययोजना सुरू केली आहे़एका नागरिकास केले होम क्वारंटाईन४पाथरी : तालुक्यातील हादगाव बु. येथे परजिल्ह्यातून आलेल्या एका व्यक्तीस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद असतानाही बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होत नसल्याचेच दिसत आहे. १३ एप्रिल रोजी हादगाव बु. येथे एक जण परजिल्ह्यातून आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी आरोग्य विभागाला दिल्यानंतर परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकाच्या हातावर शिक्का मारुन त्यास होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तालुक्यात आतापर्यंत २७९ जणांना शिक्के मारुन गावातच होम क्वारंटाईन केले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के.पी. चौधरी यांनी दिली.४बोरी : येथील ग्रामीण रूग्णालयात १० मार्च रोजी क्वारंटाईन केलेल्या रूग्णाचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक किरण चांडगे यांनी दिली़ जिंतूर तालुक्यातील देवगाव येथील या ६४ वर्षी व्यक्तीस खोकल्याचा त्रास होत होता़ तसेच हा व्यक्ती मुुंबई येथून आल्याने त्यास क्वारंटाईन केले होते़ त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यास पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे़
परभणी : सोमवारी कोरोनाचे २० संशयित दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:33 PM