लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांना डावलून निर्णय घेतला जात असल्याने नाराज झालेल्या पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या अनुषंगाने शुक्रवारी पक्षाच्या नेत्यांसोबत खाजगी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांची फेब्रुवारी महिन्यात परभणीत नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीकोनातून काही कडक निर्णय घेतले तर काही निर्णय पदाधिकाºयांना डावलून घेत असल्याच्या कारणावरुन आॅगस्ट महिन्या दरम्यान त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची चर्चा पदाधिकाºयांकडून सुरु झाली होती. त्यानंतर पृथ्वीराज यांनी नमते घेत माघार घेतली. त्यानंतर काही महिने सुरळीत कामकाज सुरु राहिले. आता मात्र गेल्या महिनाभरापासून सीईओं पृथ्वीराज आणि सत्ताधारी पदाधिकाºयांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत. ई- लर्निंगच्या सव्वा कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा प्रकरणात संबंधित क्षेत्रातील अनुभव नसलेल्या पुण्यातील एका कंत्राटदारास हे काम देण्यावरुन वाद झाला आहे. संबंधित कंत्राटदार पात्र नसताना त्याला काम देण्याचा घाट पृथ्वीराज यांच्याकडून घातला जात असल्याचा पदाधिकाºयांचा आरोप आहे. जिल्हा परिषदेच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत ही प्रक्रिया थांबविण्यात आली असल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले होते; परंतु, सर्वसाधारण सभा झाल्यानंतर पुन्हा पात्र कंत्राटदार सोडून संबंधित पुण्यातील कंत्राटदाराच्याच बाजूने पृथ्वीराज यांचा कौल असल्याचा सदस्यांचा आरोप आहे. पदाधिकाºयांच्या कामांसाठी प्रत्येक वेळी नियमावर बोट ठेवणारे पृथ्वीराज या कामासाठी मात्र नियम बाजूला का सारत आहेत, असा पदाधिकाºयांचा आरोप आहे. या शिवाय जि.प.तील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचा पदभार लघु पाटबंधारे विभागातील उपअभियंता कोणगुते यांना देण्याचा निर्णय पृथ्वीराज यांनी घेतला आहे. या निर्णयास पदाधिकाºयांचा विरोध आहे. कोणगुते यांच्याकडे यापूर्वीच लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचा पदभार आहे. त्यांची जिंतूर येथे उपअभियंतापदी बदली झाली होती; परंतु, त्यांनी प्रकृतीचे कारण सांगून सदरील पदभार स्वीकारला नव्हता. त्यानंतर मात्र त्यांनी लघु पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्याचा पदभार स्वीकारला. शिवाय त्यांच्या कामकाजासंदर्भात पदाधिकाºयांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कोणगुते यांना पदभार देऊ नये, अशी पदाधिकाºयांची मागणी आहे. नेमका त्यांनाच पदभार देण्याचा निर्णय पृथ्वीराज यांनी घेतला आहे. या विषयावरुनही सत्ताधारी आणि पृथ्वीराज यांच्यात वाद निर्माण झाला आहे. शिवाय पदाधिकाºयांच्या महत्त्वाच्या फाईल पृथ्वीराज हे अडवतात. त्याबाबत लवकर निर्णय होत नाही, आदी कारणावरुनही पदाधिकारी नाराज आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.शुक्रवारी पदाधिकारी, नेत्यांची बैठक४सीईओं पृथ्वीराज यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या निर्णयापर्यंत सत्ताधारी पदाधिकारी पोहचले आहेत. या संदर्भात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी व आ.विजय भांबळे यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. शुक्रवारी या अनुषंगाने परभणीत खाजगी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत वरिष्ठांसमोर जि.प.तील पदाधिकारी पृथ्वीराज यांच्या अडवणुकीच्या भूमिकेचा पाढा वाचणार आहेत. त्यानंतर अविश्वास ठरावा संदर्भात शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे शुक्रवारच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
परभणी : सीईओंवर अविश्वासाच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:37 AM