शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

परभणीतील उपक्रम: पथनाट्यातून सावित्रींच्या विचारांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 12:14 AM

येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेच्या वतीने पथनाट्याच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करण्याचा वसा दहा वर्षांपासून हाती घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागात जाऊन विविध सामाजिक प्रश्नांवर विद्यार्थिनींच्या माध्यामातून केला जाणारा हा जागर आता चळवळीचे रुप घेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेच्या वतीने पथनाट्याच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करण्याचा वसा दहा वर्षांपासून हाती घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागात जाऊन विविध सामाजिक प्रश्नांवर विद्यार्थिनींच्या माध्यामातून केला जाणारा हा जागर आता चळवळीचे रुप घेत आहे.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थाने मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाºया सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजातील तळागाळात पोहोचून मुलींनी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हावे, या उद्देशाने येथील सावित्रीबाई फुले कन्या शाळेने २००१ पासून सावित्रीबाई फुले महोत्सवाला सुरुवात केली. या महोत्सवातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित वैविध्यपूर्ण उपक्रम घेतले जातात. त्यात पथनाट्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. विशेष म्हणजे, एका शाळेने सुरू केलेला हा उपक्रम शाळेपुरता मर्यादित न राहता आता चळवळीचे रुप धारण करीत आहे. महिलांचे हक्क, स्त्री शिक्षण, हुंडाबळी, भारतीय संविधान अशा विषयांना हात घालत पथनाट्यातून जनजागृती केली जात आहे. २० विद्यार्थिनींचा संच यासाठी तयार केला जातो. शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन जनजागृती करण्याबरोबरच ग्रामीण भागातही पथनाट्याचे सादरीकरण केले जाते. सावित्रीबाई फुले यांची जयंती ते माता जिजाऊ यांची जयंती या काळात प्रामुख्याने पथनाट्यांचे सादरीकरण केले जाते. सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेतील शिक्षक यशवंत मकरंद हे पथनाट्याचे लेखन करतात. या उपक्रमाला आता व्यापक रुप मिळाले असून, सुनील ढवळे पथनाट्याचे दिग्दर्शन करीत आहेत. तर नागेश कुलकर्णी, रवि पुराणिक, प्रकाश पंडित, त्र्यंबक वडसकर, प्रेमानंद बनसोडे, प्राचार्य पांडुरंग पांचाळ, सुभाष जोगदंड अशी विविध क्षेत्रातील मंडळी एकत्र येऊन पथनाट्याची चळवळ राबवित आहेत. सावित्रीबाई फुले यांचे विचार तळागाळापर्यंत नेऊन खºया अर्थाने त्यांना अभिवादन करण्याचा हा वसा यापुढेही अखंडितपणे सुरू ठेवण्याचा निर्धार संयोजकांनी बोलून दाखविला.सावित्रींच्या लेकींचा सन्मान४समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया सावित्रींच्या लेकींचा सन्मानही सावित्रीबाई फुले कन्या शाळेच्या वतीने केला जातो. यावर्षी देखील हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यात एड्सग्रस्तांसाठी काम करणाºया संपदा सुधांशू देशमुख, महापालिकेतील स्वच्छता कर्मचारी अरुणा लोंढे, चंद्राबाई शिंदे, शांताबाई जोंधळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे.४सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेत ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणाºया या कार्यक्रमास महापौर मीनाताई वरपूडकर, उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे, शिक्षणाधिकारी वंदना वाव्हूळ, मनपाच्या उपायुक्त विद्याताई गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, ‘लोकमत’चे जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू कांबळे आदींची उपस्थिती राहणार आहे.नाटक, परिसंवादही...४सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नाटक, परिसंवाद, प्रभातफेरी, भित्तीपत्रके, मुलींसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा तसेच शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धाही घेतल्या जातात.

टॅग्स :parabhaniपरभणीSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेEducationशिक्षण