शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

परभणी : वाळू तस्करीसाठी आता बैलगाडीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:52 AM

ट्रक आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू वाहतूक करणे धोकादायक झाल्याने वाळूमाफियांनी आता तस्करीसाठी चक्क बैलगाडीचा वापर सुरू केला आहे. हा नवा फंडा वापरत दररोज हजारो ब्रास वाळू उपसली जात असताना महसूल प्रशासन मात्र कानाडोळा करीत आहे. पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात वाळूचे २२ धक्के आहेत. यावर्षी गोदावरीचे वरचे टोक नाथ्रा ते मुदगलपर्यंत केवळ एका वाळू धक्याचा लिलाव झाला आहे. त्यामुळे उर्वरित वाळू धक्यातून अवैध उपसा सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : ट्रक आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू वाहतूक करणे धोकादायक झाल्याने वाळूमाफियांनी आता तस्करीसाठी चक्क बैलगाडीचा वापर सुरू केला आहे. हा नवा फंडा वापरत दररोज हजारो ब्रास वाळू उपसली जात असताना महसूल प्रशासन मात्र कानाडोळा करीत आहे.पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात वाळूचे २२ धक्के आहेत. यावर्षी गोदावरीचे वरचे टोक नाथ्रा ते मुदगलपर्यंत केवळ एका वाळू धक्याचा लिलाव झाला आहे. त्यामुळे उर्वरित वाळू धक्यातून अवैध उपसा सुरू आहे.महसूल प्रशासन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करीत आहे. रस्त्यावरून जाणारी ही वाहने पकडून हजारो रुपयांचा दंड लावला जात आहे. त्यामुळे वाळूमाफियांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वाहनांवर वारंवार कारवाई होत असल्याने वाळूमाफियांनी आता नवीन शक्कल शोधली आहे. त्यात बैलगाडीचा वापर केला जात आहे. वाळूघाटांवरून बैलगाडीच्या सहाय्याने वाळू आणायची, या वाळूचा साठा करायचा आणि तेथून वाटेल तेथे ही वाळू घेऊन जायची. मागील काही महिन्यांपासून अशा पद्धतीने वाळूची तस्करी जोरात सुरू आहे; परंतु, महसूल प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वाळूची सर्रास चोरी सुरू असल्याचे दिसत आहे.जुन्या पद्धतीला नवा मुलामाच्१५ ते २० वर्षापूर्वी ज्यांना बांधकाम करावयाचे आहे, असे व्यक्ती गोदाकाठच्या गावात जाऊन बैलगाडी किंवा गाढवावर वाळू आणत होते. मध्यंतरीच्या काळात अशा पद्धतीने वाळू आणणे खर्चीक झाल्याने ही पद्धत बंद झाली होती. मात्र मागील काही दिवसांपासून वाळू वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर पुन्हा दिसू लागला आहे.च्गोदावरी पात्रातून वाहनाने वाळू चोरणे अडचणीचे ठरत असल्याने बैलगाडीचा वापर सुरू करण्यात आला आहे. सूर्योदयापासून वाळू उपसण्याला सुरूवात होत असून ही वाळू गावाबाहेर साठा करून ठेवली जाते. तेथे विक्री करण्याचा व्यवसाय सध्या सुरू आहे. नदीपात्रातील वाळू उपसण्यासाठी बैलगाडीचालक १५० ते २०० रुपये घेतात. विशेष म्हणजे, बैलगाडी व गाढवावरून वाळू वाहतूक करताना कोणी रोखत नाही. त्यामुळे हा उपसा बिनबोभाटपणे सुरू आहे.नियमबाह्यपद्धतीने होतेय वाळूचे उत्खननच्मागील काही वर्षांपासूून वाळू धक्क्याच्या लिलावात पुढाऱ्यांचा शिरकाव झाला आहे. वाळू व्यवसायातून करोडो रुपयांची माया जमविली जात आहे. नियमबाह्यउपसा केल्याने पात्रात मोठे खड्डे पडले असून उन्हाळ्यात पाणीसाठा होत नाही. मागील दोन वर्षात वाळूचे दर गगनाला भिडले आहेत.च्त्यामुळे बांधकाम करणे शक्य नाही. गोपेगाव आणि डाकू पिंपरी या दोन धक्यांचा लिलाव झाला असून त्यातून प्रचंड वाळू उत्खनन होत आहे. दिवसा मजुरांच्या सहाय्याने आणि रात्री यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र याविरुद्ध कारवाई होत नाही.अधिकाºयांवरच नजरकारवाईच्या धास्तीने वाळू चोरी कमी झाली असली तरी वाळू तस्करी करणारे महसूल विभागाच्या अधिकाºयांवर नजर ठेवून तस्करी करीत आहेत.अधिकाºयांच्या निवासस्थानासमोरच पाळत ठेवली जात असून गाडी कोणत्या दिशेने जाते, त्यावरून वाळू तस्करीचा वेळ ठरविला जात आहे. त्यामुळे अधिकाºयांची कारवाई अनेक वेळा निष्फळ ठरते.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूriverनदी