लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दोन महिन्यांपासून गगनाला भिडलेले भाजीपाल्याचे भाव मागील आठवड्यात अचानक कोसळल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, निम्म्यापेक्षाही कमी दर झाल्याने आता पुन्हा स्वयंपाकात भाज्यांचे प्रमाण वाढणार आहे.यावर्षी जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने खरीप आणि रब्बी हंगाम हातचा गेला होता. परिणामी आॅक्टोबर महिन्यापासून रिकाम्या असलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला घेण्याचा प्रयोग केला. वांगे, फुलकोबी, भेंडी, टोमॅटो, मिरची आदी दैनंदिन आहारात लागणारा भाजीपाला घेऊन उत्पन्न मिळण्याचा प्रयत्न काही शेतकऱ्यांनी केला. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये या भाजीपाल्यामधून शेतकºयांना बºयापैकी उत्पन्नही मिळाले; परंतु, जानेवारी महिन्यापासून मात्र परिस्थिती बदलत गेली. भाजीपाल्यासाठीही पाणी मिळेनासे झाले. परिणामी भाजीपाल्याच्या उत्पन्नातही मोठी घट झाली होती.शेत जमिनीतून उत्पादित होणाºया भाजीपाल्यात घट झाल्याने शहरी भागातील बाजारपेठेतही आवक घटली आणि भाज्यांचे भाव कडाडले. वांगे ६० ते ८० रुपये किलो, कोबी, भेंडी, गवार ८० रुपये किलो प्रमाणे विक्री झाली. तर सिमला मिरची १०० रुपये किलो आणि गावरान मिरची १०० रुपये किलो प्रमाणे विक्री झाले. पालेभाज्यांचेही भाव वाढले होते. तसेच टोमॅटो, भेंडी, काकडीचे दरही कडाडल्याने मागील तीन ते चार महिन्यांपासून भाजी खरेदी करताना सामान्यांच्या खिशाला झळ पोहचत होती. त्यामुळे अनेकांनी भाज्या वर्ज्य केल्या होत्या. दुपार आणि रात्रीच्या जेवणात भाजीचा वापर करणाºयांनी एकाच वेळी भाजीचा वापर करणे सुरु केले होते. भाज्यांचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त होते.दोन दिवसांपासून भाजीपाल्याच्या भावात घट झाली आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत भाजीपाल्यांची घटलेली आवक सोमवारी मात्र वाढल्याचे दिसून आले. एरव्ही एकाच गाड्यावर अनेक भाज्या विक्री होत असत; परंतु, आवक वाढल्यामुळे एक-एक भाजी घेऊनही गाड्यावरुन विक्री होत असल्याचे पहावयास मिळाले.सोमवारी परभणी बाजारपेठेतील भाज्यांचे दर चांगलेच घटले होते. मिरची ५० रुपये किलो, वांगे ३० रुपये किलो, टोमॅटो ६० रुपये किलो, कोबी ५० रुपये किलो, फुलकोबी ८० रुपये किलो या दराने विक्री झाली. निम्म्यानेच भाजीपाल्याचे भाव घटल्याचे दिसून आले. दोन ते तीन महिन्यानंतर परभणी बाजारपेठेतील भाजीपाल्याचे भाव घटल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.दुष्काळाचा परिणाम : बोरीच्या आठवडी बाजारातही खरेदीदार फिरकेनात४दीड महिन्यांपासून बोरी व परिसरात पावसाने दांडी मारल्यामुळे आठवडी बाजारात येणाºया बाजारकरूंची गर्दी कमी होऊ लागली आहे. यामुळे तीन आठवड्यापासून भाजीपाल्यांचे भाव अर्ध्यावर आले आहेत. २०० रुपये किलो विकणारी कोथंबीर आज ५० रुपये किलो दराने विकली, ६० रुपये किलो दराने विकणारे वांगे २० रुपये किलो दराने विक्री झाले. ६० रुपये किलो दराने विक्री होणारी काकडी ३० रुपये किलो दराने विक्री झाली.४ १०० रुपये किलो दराने विक्री होणारी मेथी ६० रुपये किलो दराने, ६० रुपये किलो दराचे कारले ३० रुपये, ६० रुपये दराने विक्री होणारे टोमॅटो ३० रुपये किलो दराने विक्री झाले. त्याचप्रमाणे ६० रुपये किलो दराने विकणारी भेंडी ३० रुपये किलो दराने विक्री झाली. ३० रुपये किलो दराने विक्री होणारी चवळी २० रुपये किलोने विक्री झाली. ४० रुपये किलोने विकणारी गवार ३० रुपये किलोने विक्री झाली.४तसेच पालक भाजी दहा रुपये, शेपूची भाजी १० रुपये या दराने विक्री झाली. तीन आठवड्यांपूर्वी भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले होते. दीड महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे बाजारात येणाºया बाजारकरूंची गर्दी कमी झाली आहे. आज भाजीपाल्यांचे भाव अर्ध्या किमतीवर आले आहेत.४ दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांच्या हाताला काम नाही काम नाही. परिणामी मजुरांकडे पैसा शिल्लक नाही. याचा परिणाम आठवडी बाजारावर झाला आहे. मोठ्या मेहनतीने पिकवलेला भाजीपाला कवडीमोड भावाने विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. तीन आठवड्यांपूर्वी भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले होते. आगामी दोन आठवडे पाऊस न झाल्यास भाजीपाल्याचे भाव पुन्हा वाढतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.कोथिंबिरीचे दर दोनशेवरुन ८० रुपये किलोवर४जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला होता. आवक घटल्यामुळे सर्वच भाजीपाला महागला; परंतु, त्यातही कोथंबीरचे दर मात्र चांगलेच कडाडले होते. प्रत्यक्ष भाजीसाठी आवश्यक असणारी कोथंबीर २०० रुपये किलो दराने विक्री झाली होती.४किरकोळ बाजारात १५ रुपये छटाक या दराने कोथंबीरची विक्री झाली. सोमवारी मात्र हीच कोथंबीर ८० रुपये किलो दराने विक्री झाली. त्यामुळे अनेक दिवसानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या हिशोबात भाजीपाल्याचे दर आले आहेत.
परभणी : भाजीपाल्याचे भाव गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:21 AM