लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : गेल्या २० दिवसांपासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असल्याने कापसाचा घसरणारा भाव शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावणारा ठरला आहे़ सोनपेठ बाजारपेठेमध्ये २८ डिसेंबर रोजी ५ हजार ४०० रुपयांवर स्थिरावला आहे़अपुरा पाऊस व बोंडअळी यामुळे तालुक्यातील शेतकºयांना कापसाचे अपेक्षित उत्पन्न झाले नाही़ कापसाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनपेठ तालुक्यात केवळ ४२८ मिमी पाऊस झाला़ त्यामुळे कापसाची एकाच वेचणीत पºहाटी झाल्याचे चित्र दिसले़ यावर्षी दुष्काळाने संकटांचा डोंगर उभा केल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसला आहे़ पिकांची झालेली हानी, बेताची आर्थिक परिस्थिती व चारा आणि पाणीटंचाई यामुळे दुष्काळाशी दोन हात करताना बळीराजा पुरता कोलमडून गेला आहे़ पावसाने दगा दिल्याने आता अपेक्षा तरी कोणाकडून करायची? या चिंतेत सध्या शेतकरी आहेत. जून, जुलैमध्ये खरिपाच्या पेरण्या केल्या; परंतु, पावसाने दोन महिन्यांचा मोठा खंड दिल्याने शेतकºयांच्या पदरी निराशा आली़ आधीच कापसाचे उत्पादन कमी आणि त्यावर मजुरांवर होणारा खर्चही अधिक आहे़ त्यातच गेल्या २० दिवसांपासून कापसाच्या भावात सतत घसरण सुरू असून, सध्या भाव ५ हजार ४०० रुपयांवर स्थिरावला आहे़ कापसाच्या भावात होणारी घसरण शेतकºयांची चिंता वाढविणारी आहे़ आधीच उत्पादन कमी व भावही कमी या कात्रीत सध्या शेतकरी सापडला आहे़ कापसाचे भाव वाढतील, अशी अपेक्षा असताना भाव मात्र ५ हजार ४०० रुपयांच्या पुढे सरकण्यास तयार नाही़ कापसाला ६ हजार रुपये भाव मिळेल, या आशेने अनेक शेतकºयांनी अजूनही आपला कापूस बाजारात विक्रीसाठी आणलेला नाही़२७ हजार क्विंटल : कापसाची झाली खरेदी४यावर्षी सोनपेठ तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद ही पिके हातची गेली आहेत. त्यामुळे ज्या शेतकºयांकडे उपलब्ध पाणी होते त्या शेतकºयांना कसेबसे कापूस पीक घेतले आहे.४मागील वर्षी सोनपेठ बाजारपेठेत ८१ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती; परंतु, यावर्षीच्या दुष्काळाने आतापर्यंत केवळ २७ हजार क्विटंल खरेदी झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीमधून देण्यात आली.७ हजार रुपये क्विंटलचा भाव द्या४ यावर्षी शेतकºयांना दुष्काळामुळे अत्यल्प कापसाचे उत्पन्न झाले आहे. त्यामुळे बाजार पेठेत कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, कापसाचा भाव मात्र दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्रती क् िवंटल सात हजार रुपयांचा भाव देण्याची मागणी होत आहे.यावर्षी अगोदरच दुष्काळी परिस्थितीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यातच भाव घसरल्याने शेतकºयांना कापूस विक्रीसाठी भाव वधारण्याची वाट पहावी लागत आहे.-केशव भोसले, शेतकरी
परभणी : भाव घसरल्याने कापूस उत्पादक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:51 AM