लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): सेलू तालुक्याची निर्मिती होऊन जवळपास दोन तपाहून अधिक काळ लोटला तर सेलू शहरासाठी बारा वषार्पूर्वी स्वतंत्र १३२ केव्ही वीज केंद्राची मंजुरी देण्यात आली. मात्र उभारणीचे काम रखडल्याने सेलू तालुक्यातील वीज ग्राहकांना एक तपाहून अधिक काळापासून केंद्राची प्रतीक्षा कायम आहे. निजामकाळातही सेलू हे उपजिल्हाचे ठिकाण राहिलेले आहे. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या नावलौकिक असलेल्या शहराला दरवर्षी पहिल्या पावसापासून विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने सेलू शहराचा वीजपुरवठा तब्बल आठ तास खंडित झाला होता. शेकडो गावांची वीज दोन दिवसांपासून गुल झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी रात्र जागून काढली आहे.२००७ साली सेलू तालुक्यासाठी हादगाव पावडे शिवारात १३२ केव्ही वीज केंद्र मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर वीज केंद्र उभारणीसाठी बारा एकर जमीन घेण्यात आली. त्या ठिकाणी संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले; परंतु, प्रत्यक्ष वीज केंद्र उभारणीचे काम अद्यापही होऊ शकले नाही. सेलू तालुक्याला परतूर, पाथरी व जिंतूर शहरातील १३२ वीज केंद्रातील वीज पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. परिणामी थोडा पाऊस व वारा झाला तर तासन्तास वीजपुरवठा खंडित होते. सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव, डासाळा, सेलू औद्योगिक ३३ के.व्ही उपकेंद्राला पाथरी येथून तर वालूर, हादगाव केंद्राला परतूर आणि कान्हड, चिकलठाणा, नांदगाव या केंद्राला जिंतूर येथून वीजपुरवठा करण्यात येतो. पाथरी, परतूर व जिंतूर येथील १३३ केव्ही वीजकेंद्र तालुक्यातील सर्व गावांना वीजपुरवठा सुरळीत केल्यानंतर सेलू तालुक्यातील वीज उपकेंद्राला वीज देतात. थोडाही तांत्रिक बिघाड झाल्यास सेलू तालुक्यातील वीज उपकेंद्र बंद पडतात. त्यामुळे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सेलू तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार खंडित होतो.तीनही मंजूर वीज उपकेंद्राचे काम रखडले४सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव, सेलू व हादगाव येथे दोन वर्षांपूर्वी ३३ के.व्ही वीज उपकेंद्र मंजूर करण्यात आले. ढेंगळी पिंपळगाव व हादगाव येथे उपकेंद्राला जागा उपलब्ध करण्यात आली.४अद्यापही या केंद्राचे संपूर्ण काम होऊ शकले नाही. सेलू शहरासाठी उभारण्यात येणाºया केंद्राला जागा उपलब्ध नाही. त्यामुळे तीनही ठिकाणाचे काम रखडले आहे. प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव लोकप्रतिनिधीमध्ये जाणवला आहे. विजेसारख्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.तीन केंद्र पडले बंदशुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह पाऊस झाल्याने कान्हड, चिकलठाणा, नांदगाव येथील ३३ के.व्ही. वीज उपकेंद्र बंद पडले आहेत. तसेच खांब, वीज रोहित्र जमीनदोस्त झाले आहेत. दोन दिवसांपासून या केंद्रांतर्गत येणाºया गावांची वीज गूल झाली आहे.सेलू शहरासह तालुक्यातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वसाहत आदी मिळून सुमारे ३२ हजार वीज ग्राहक आहेत. सर्व सामान्यपणे या ग्राहकांना दरमहिनाला ८० लाख युनिट वीज लागते तर उन्हाळ्यात हा आकडा १०० लाख युनिटवर जातो. सेलू शहराला सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी पाथरी येथून स्वतंत्र लाईन आहे. विजेची मागणी लक्षात घेता सेलू येथे १३२ के .व्ही वीज केंद्र असणे आवश्यक आहे.-राजेश मेश्राम, उपविभागीय वीज अभियंता, सेलूसेलू तालुका निर्मितीसाठी सेलूकरांनी खूप दिवस संघर्ष केला आहे. वेळप्रसंगी आंदोलन तसेच तीव्र लढा दिल्यानंतर सेलू तालुक्याची निर्मिती शासनाला करावी लागली. मात्र तालुक्यासाठी स्वतंत्र १३२ केव्ही वीज केंद्र मंजूर असूनही उभारणी करण्यास विलंब होत आहे. परिणामी शहरासह ग्रामीण भागात विजेची समस्या गंभीर आहे. आगामी काळात १३२ केव्ही वीज केंद्रासाठी लढा उभारण्यात येईल.-हेमंत आडळकर, माजी नगराध्यक्ष, सेलू
परभणी : एक तपानंतरही १३२ केव्ही केंद्राची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:15 AM