लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी आणि पूर्णा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सिद्धेश्वर प्रकल्पामधून दीड दलघमी पाणी घेण्याचा निर्णय झाला असून २ नोव्हेंबर रोजी दोन्ही शहरांसाठी पाणी सोडले जाणार आहे.परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयातील पाणी संपले आहे. तसेच पूर्णा शहरासाठीही पाण्याची आवश्यकता असल्याने दोन्ही शहरांसाठी सिद्धेश्वर प्रकल्पामधून पाणी घेण्याचा निर्णय झाला आहे. परभणी शहरासाठी १ दलघमी आणि पूर्णा शहरासाठी ०.५ दलघमी पाणी सोडले जाणार आहे. ३ नोव्हेंबर रोजी हे पाणी राहटी बंधाºयात पोहचेल.राहटी बंधाºयाची दुरुस्ती अंतिम टप्प्यात४राहटी बंधाºयाच्या प्लेट जुन्या झाल्याने या प्लेट बदलण्याचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. ३५२ प्लेट बदलल्या जाणार असून गुरुवारी सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल. दरम्यान, बुधवारी महापौर मीनाताई वरपूडकर, सभागृहनेते भगवान वाघमारे, आयुक्त रमेश पवार, शहराध्यक्ष वसीम पठाण, शाखा अभियंता शेख ईस्माईल यांच्या उपस्थितीत कामाची पाहणी करण्यात आली. ३ नोव्हेंबर रोजी बंधाºयात पाणी दाखल होईल. तत्पूर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार आहे.
परभणी, पूर्णेसाठी शुक्रवारी येणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:30 AM