लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : तालुक्यातील ६४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी विहीर, बोअर अधिग्रहणाबरोबर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीकडे ८८ प्रस्ताव दाखल केले आहेत. यामध्ये ७७ प्रस्ताव हे अधिग्रहणासाठी असून ११ प्रस्ताव टँकरसाठी आहेत. यापैकी ५२ प्रस्तावांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे.अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे तालुक्यातील नदी, नाले कोरडेठाक पडले आहेत. दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत असल्याने डोंगर भागासह गोदाकाठच्या गावातील विहीर, बोअरचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नदी, नाले, पाझर तलाव, गोदावरी नदी पात्र व मासोळी प्रकल्प कोरडाठाक पडल्याने गोदावरी नदीकाठी वसलेल्या गंगाखेड शहराबरोबर तालुक्यातील गावागावांत मार्च महिन्यातच निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ तालुकावासियांवर आली आहे. गत पाऊसाळ्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पर्जन्यमान झाल्याने तालुक्यातील गावांना नोव्हेंबर महिन्यातच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे तालुक्यातील ७७ गावांतील ग्रामपंचायतींनी विहीर व बोअर अधिग्रहणासाठी पंचायत समिती प्रशासनाकडे ७७ प्रस्ताव दाखल केले. तर तालुक्यातील गोदावरी तांडा, उमलानाईक तांडा, पडेगाव, खंडाळी, छबुनाईक तांडा, मरडसगाव, विठ्ठलवाडी, इळेगाव, गुंडेवाडी, गणेशपुरी मठ, गुंजेगाव या गावात विहीर, बोअर अधिग्रहण करण्यासारखी परिस्थिती नसल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. टँकरची मागणी करणाऱ्या ११ गावांपैकी गोदावरी तांडा व उमलानाईक तांडा येथील २ टँकर तसेच डोंगरगाव शे., पांगरी, मरगिळवाडी, वागदेवाडी, कोद्री, हरंगुळ, उंडेगाव, भगवान बाबा वस्ती, ढवळकेवाडी, नरळद, सिरसम, देवकतवाडी, चिमानाईक तांडा, लिंबेवाडी, खादगाव, वागदरा, वागदरा तांडा, टाकळवाडी, सुरळवाडी, खोकलेवाडी, मरडसगाव, बोर्डा, देवलानाईक तांडा, तांदुळवाडी, हनुमान वस्ती, उंबरवाडी, रुस्तुमनाईक तांडा, मानकादेवी, राणीसावरगाव, कौडगाव, धनगरमोहा, गौळवाडी, गौळवाडी तांडा, ढेबेवाडी, कासारवाडी, गोपा, पांढरगाव, मालेवाडी, बोथी, हनुमाननगर तांडा, डोंगरजवळा या गावातील ५० विहीर, बोअर अधिग्रणाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित ३६ गावे अद्यापही अधिग्रहणाच्या प्रतिक्षेत आहेत. याकडे लक्ष देऊन हे प्रस्ताव तत्काळ निकाली काढावेत, अशी मागणी तालुकावासियातून होत आहे.या गावातून अधिग्रहणासाठी प्रस्तावतालुक्यातील मालेवाडी, कासारवाडी, सुरळवाडी, गोदावरी तांडा, ढवळकेवाडी, कौडगाव, धरमनगरी, मरगीळवाडी, डोंगरगाव, डोंगरजवळा, वागदेवाडी, कोद्री, हरंगुळ, उंडेगाव, भगवानबाबा वस्ती, सीरसम, देवकतवाडी, खादगाव, वागदरा, वागदरातांडा, टाकळवाडी, खोकलेवाडी, हनुमान वस्ती, मरडसगाव, बोर्डा, देवलानाईक तांडा, तांदुळवाडी, उंबरवाडी, रुस्तुमनाईक तांडा, ऊंबरवाडीतांडा, मानकादेवी, पडेगाव, उमलानाईक तांडा, डुमनरवाडी, खंडाळी, राणीसावरगाव, पांगरी, चिमानाईकतांडा, लिंबेवाडी, धनगरमोहा, कातकरवाडी, गौळवाडी, गौळवाडीतांडा, ढेबेवाडी, गोपा, पांढरगाव, मानकादेवी, गोदावरीतांडा, खंडाळी, नरळद, बोथी, इरळद, छबुनाईक तांडा, इळेगाव, गुंडेवाडी, हनुमाननगर तांडा, आरबुजवाडी, सायबेटवाडी, निळानाईक तांडा, कुंडगिरवाडी, सुप्पा जहागीर, मागासवर्गीय वस्ती, विठ्ठलवाडी, वालुनाईक तांडा, गुंजेगाव, गणेशपुरी मठ, दामपुरी आदी गाव वाडी तांड्याबरोबरच डोंगर भागातील व गोदावरी नदी काठच्या गावांनी पंचायत समिती कार्यालयाकडे एकूण ७७ विहीर, बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल केले आहेत.टँकरच्या फेऱ्या वाढविण्याची मागणीतालुक्यातील गोदावरी तांडा येथील १ हजारच्या जवळपास लोकसंख्या असून अंदाजे ४०० जनावरांसाठी दरदिवशी टँकरच्या २ फेºया होत आहेत. लोकसंख्येबरोबर जनावरांची संख्या अधिक असल्याने टँकरच्या २ फेऱ्यांचे पाणी पुरत नसल्याने ५ ते ६ दिवसानंतर पाणी घेण्यासाठी घराचा नंबर येत असल्याचे येथील ग्रामस्थ प्रेमदास राठोड यांनी सांगितले. तर ४५० लोकसंख्या व २५० जनावरांची संख्या असलेल्या उमलानाईक तांडा येथे १२ हजार लिटर पाणी क्षमता असलेल्या टँकरच्या २ फेºया कराव्यात, अशी मागणी आहे. मात्र दरदिवशी १२ हजार लिटर पाण्याच्या टँकरची एकच फेरी होत असल्याने गावाला पाणी पुरत नाही, असे गणेश राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गोदावरी तांडा तसेच उमलानाईक तांडा येथील टँकरच्या फेºया वाढवाव्या, अशी मागणी ग्रामस्थांतुन होत आहे.गोदावरी तांडा व उमलानाईक तांडा या दोन्ही गावात १ खाजगी व एका शासकीय टँकरने दरदिवशी ३ फेºया करून पाणी पुरवठा केल्या जात आहे. तसेच उर्वरित गावातील विहीर, बोअर अधिग्रणाचे प्रस्ताव मंडळ अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे तपासणी अहवालासाठी पाठविण्यात आले आहेत. ५०० मीटरच्या आत पाणी उपलब्ध असलेल्या गावांचे प्रस्ताव ग्राम पंचायतीकडे परत पाठविण्यात आले आहेत.-एस.एस. वाडकरपाणीपुरवठा विभाग,कनिष्ठ सहाय्यक
परभणी : गंगाखेड तालुक्यात ६४ गावांवर जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:28 AM